Join us

पालिका कंत्राटदार मारहाणप्रकरणी मनसे नगरसेवक संजय तुर्डेंना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 12:02 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईतील एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई:  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईतील एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या कंत्राटदार आणि अभियंत्याला मारहाण केल्याचा आरोपानंतर तुर्डेंना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. 

कुर्ला येथील शौचालयाच्या बांधकामात दिरंगाई होत असल्याने सोमवारी कंत्राटदार आणि अभियंत्याला मारहाण केल्याचा आरोप तुर्डे यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी तुर्डे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर कुर्ला पोलिसांनी तुर्डे यांना अटक केली. 

कोण आहेत संजय तुर्डे?

संजय तुर्डे हे कुर्ल्यातील वॉर्ड क्रमांक 166 चे नगरसेवक आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी सहा नगरसेवकांनी सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता संजय तुर्डे हे मनसेचे एकमेव नगरसेवक आहेत.  

टॅग्स :मनसेमुंबईपोलिस