mns chief raj thackerays son amit thackeray tested coronavirus positive admitted in hospital | Coronavirus : राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण

Coronavirus : राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण

ठळक मुद्देअमित ठाकरे यांना लिलावती रुग्णालयात करण्यात आलं दाखलकोरोना चाचणी आली सकारात्मक

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबईतही दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद केली जात आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची साखळी मोडण्यासाठी राज्य सरकारनं कठोर निर्बंधही घातले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. 

अमित ठाकरे यांना कोरोनाची लक्षणं जाणवत होती. त्यानंतर त्यांनी कोरोनाची चाचणी केली. त्यांची चाचणी सकारात्मक आल्यानंतर त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.

राहुल गांधींनाही कोरोनाची लागण

यापूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली होती. "कोरोनाची काही सौम्य लक्षणे जाणवू लागल्यानंतर मी चाचणी करून घेतली होती. त्यात मला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झालं आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी. तसंच सुरक्षित राहण्यासाठी कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करावं," असं राहुल गांधी यांनी ट्विटरवरून सांगितलं.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: mns chief raj thackerays son amit thackeray tested coronavirus positive admitted in hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.