Amit Raj Thackeray : राज ठाकरे आजोबा होणार; 'शिवतीर्थ'वरून आली 'गुड न्यूज'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 13:31 IST2022-03-01T13:30:51+5:302022-03-01T13:31:17+5:30
राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि त्यांच्या पत्नी मिताली आई-बाबा होणार आहेत.

Amit Raj Thackeray : राज ठाकरे आजोबा होणार; 'शिवतीर्थ'वरून आली 'गुड न्यूज'
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांच्या कुटुंबातून एक गोड बातमी आली आहे. राज ठाकरे हे लवकर आजोबा होणार आहेत. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे यांच्याकडे गोड बातमी असल्याचं वृत्त आहे. काही दिवसांपूर्वीच अमित ठाकरे यांच्याकडे मनसेच्या विद्यार्थी सेनेची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आता अशातच त्यांच्या खासगी आयुष्यातीलही गोड बातमी समोर आली आहे.
राज ठाकरे यांच्या नव्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी आनंदाचं वातावरण आहे. नुकतेच राज ठाकरे हे आपल्या कुटुंबीयांसह कृष्णकुंजवरून शिवतीर्थ या आपल्या नव्या निवासस्थानी वास्तव्यास गेले आहेत. मिताली ठाकरे आणि अमित ठाकरे आता आई-बाबा होणार असल्यानं ठाकरे कुटुंबात उत्साहाचं वातावरण आहे.
२७ जानेवारी २०१९ रोजी अमित ठाकरे आणि मिताली बोरूडे यांचा विवाह झाला. लोअर परळमधील सेंट रेजिस या हॉटेलमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. मिताली बोरूडे या फॅशन डिझायनर आहेत. त्यांनी फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचं शिक्षण पूर्ण केलंय. त्यांचे वडिलही प्रसिद्ध सर्जन आहेत. काही वर्षांपूर्वी मिताली आणि राज ठाकरे यांच्या कन्या उर्वशी ठाकरे यांनी 'द रॅक' हा कपड्यांचा ब्रँड लाँच केला होता.