Join us  

राज ठाकरेंची फेसबुक पाठोपाठ ट्विटरवर एन्ट्री, पाहा पहिलं ट्विट 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2018 10:42 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं पहिलं ट्विट...

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडिया फेसबुकनंतर आता ट्विटरवरही एन्ट्री केली आहे. राज ठाकरे यांनी आपले अधिकृत ट्विटर हँडल @RajThackeray या नावे सुरु करताच अनेकांनी त्यांना फॉलो करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त त्यांनी पहिलं ट्विट करत जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

''आज महाराष्ट्र दिन ! आज मराठी माणसाला त्याच्या हक्काचं राज्य मिळालं आणि एका अर्थानं मराठी भाषेला मान्यता मिळाली. हे राज्य मिळवण्यासाठी अनेका-अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, अपार कष्ट झेलले. आज त्या सर्वांची आठवण करण्याचा आणि आपली जबाबादारी जाणण्याचा दिवस! जय महाराष्ट्र !'', असे पहिले ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे. 

राज ठाकरे यांनी ट्विटरवर एन्ट्री करताच चाहत्यांनी त्यांना फॉलो करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत जवळपास 5 हजारहून अधिक त्यांचे फॉलोअर्स बनले आहेत. राज ठाकरे यांनी फेसबुकवर एन्ट्री केल्यानंतर बरेच चर्चेत होते. फेसबुकवर व्यंगचित्र शेअर करत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत अनेकांवर टीकास्त्र सोडले आहे. शिवाय, राज ठाकरे यांच्या फेसबुक पेजवर त्यांच्या सभा लाइव्ह दाखवल्या जातात. 

 

टॅग्स :राज ठाकरेमहाराष्ट्र दिनट्विटरसोशल मीडिया