'...तर केंद्र सरकारने त्वरित हालचाल करावी'; जैन बांधवांच्या मागणीवर राज ठाकरेंचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 03:35 PM2023-01-05T15:35:31+5:302023-01-05T15:40:07+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जैन बांधवांच्या मागणीशी पूर्ण सहमत असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

MNS Chief Raj Thackeray has said that MNS fully agrees with the demand of Jain Bandhav. | '...तर केंद्र सरकारने त्वरित हालचाल करावी'; जैन बांधवांच्या मागणीवर राज ठाकरेंचं विधान

'...तर केंद्र सरकारने त्वरित हालचाल करावी'; जैन बांधवांच्या मागणीवर राज ठाकरेंचं विधान

Next

मुंबई: शिखरजी, गिरनारजी आणि शत्रुंजय यांच्या पावित्र्यासह सुरक्षेसाठी ठेवण्याची शपथ चळवळ सुरू ठेवण्या आचार्यांसह हजारो जैन बांधवांनी मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान मार्गे बुधवारी काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान घेतली. जैन बांधव, महिला व लहान मु मोठ्या संख्येने रैलीत सामील झाली होती. जैन एकात्मतेचे असे दृश्य यानिमित्ताने पाहण्यास मिळाले. दिगंबर, श्वेतांबर पंथ यानिमित्ताने एकत्र आले होते. 

उपोषणाला बसलेले संजय जैन म्हणाले की, सरकारच्या विनंतीवरुन आम्ही १५ दिवसांची मुदत दिली असून, मागण्या मान्य होईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे. आचार्य लोकेशजी यांनी जैन तीर्थक्षेत्रांच्या पावित्र्यासाठी व अखंडतेसाठी शासनाला इशारा देत तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य आणि अखंडता भंग करण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असे सांगितले. 

सदर प्रकरणावर आता मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. झारखंडमधल्या गिरीहीद जिल्ह्यातलं 'सम्मेद शिखरस्थळ' हे जैन धर्मियांचं पवित्रस्थळ आहे. ह्या धर्मस्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊ नये, कारण एकदा का ते पर्यटनस्थळ म्हणून घोषित झालं की तिथे जैन धर्माला मान्य नसलेल्या अनेक गोष्टी घडू शकतील अशी जैन बांधवांची भावना असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जैन बांधवांच्या मागणीशी पूर्ण सहमत आहे. झारखंड सरकारने जैन धर्मियांच्या तीव्र भावनांचा विचार करून हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, आणि हे होत नसेल तर केंद्र सरकारने ह्यात त्वरित हालचाल करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. 

दरम्यान, आचार्य नयपद्मसागरजी म्हणाले की, सरकारने लवकरात लवकर पालीताणा, सम्मेद शिखरजी हे पवित्र तीर्थक्षेत्र क्षेत्र म्हणून घोषित करावे आणि १० किलोमीटर परिसरात मांस, मद्यविक्रीवर बंदी घालावी. आचार प्रमाण सागरजी व माताजी म्हणाले की, सम्मेद शिखरजी हे चिरंतन तीर्थक्षेत्र आहे. त्यांचे पावित्र्य भंग झाल्या आपण स्वतः अन्नपाण्याचा त्याग करू तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वे म्हणाले की, महाराष्ट्र सरकार जैन समाजाच्या भावना केंद्र सरकार आणि संबंधित राज्य सरकारपर्यंत पोहोचवणार आहे.

Web Title: MNS Chief Raj Thackeray has said that MNS fully agrees with the demand of Jain Bandhav.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.