'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 06:49 IST2026-04-04T06:49:54+5:302026-04-04T06:49:54+5:30

मनसे संपर्क अध्यक्षांची यादी जाहीर

MNS Chief Raj Thackeray Announces New Appointments to Strengthen Party | 'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे

'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे

मुंबई: जनतेच्या प्रश्नांवर थेट लढा देणारा पक्ष म्हणून जनमानसात ओळख करा, असे आदेश देतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संघटनात्मक बांधणीत महत्त्वाचे बदल केले आहेत. शिवतीर्थ निवासस्थानी त्यांनी संपर्क अध्यक्षांची बैठक घेत पक्षवाढीचा रोडमॅप मांडून नव्या नेमणुका जाहीर केल्या.

मनसेने 'संपर्क अध्यक्ष पद कार्यान्वित करून पक्षाचे नेते, सरचिटणीस, मुंबईतील विभाग अध्यक्षांवर विविध जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे. प्रत्येक महिन्यात किमान तीन दिवस संबंधित जिल्ह्यास भेट देऊन कामाचा आढावा घ्यावा. स्थानिक नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. त्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना राज यांनी केल्या.

आगामी निवडणुकांचा विचार करता पुढील साडेतीन वर्षाच्या कालावधीत प्रत्येक जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढविण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे त्यांनी बैठकीत अधोरेखित केले.

हे आहेत नवे संपर्क अध्यक्ष 

कोकण विभाग : संदीप देशपांडे, योगेश परुळेकर, राजेश येरुणकर (रायगड), शिरीष सावंत, संदीप दळवी (सिंधुदुर्ग), नितीन सरदेसाई, शिरीष सावंत (रत्नागिरी), मनोज चव्हाण, संजय नाईक (ठाणे), प्रमोद (राजू) पाटील, केतन नाईक (पालघर). 

मराठवाडा विभाग : बाळा नांदगावकर, बंटी म्हशीलकर, दिलीप चितलिंगे, बिपीन नाईक (छ. संभाजीनगर), राजेंद्र वागसकर (धाराशिव), दिलीप धोत्रे (लातूर), जयप्रकाश बाविस्कर (जालना), संतोष नागरगोजे, सतनामसिंग गुलाटी (नांदेड). 

पश्चिम महाराष्ट्र : अमित ठाकरे, अविनाश अभ्यंकर, अमेय खोपकर (पुणे), किशोर शिंदे, सुधीर पाटसकर (सोलापूर), रणजित शितोळे, गणेश सातपुते (सातारा), यशवंत किल्लेदार, नंदकुमार चिले (कोल्हापूर). 

उत्तर महाराष्ट्र: अविनाश जाधव, अभिजीत पानसे (नाशिक), प्रकाश भोईर (धुळे), कर्णबाळा दुनबळे (नंदुरबार), संदीप पाचंगे, आशिष साबळे (जळगाव), नयन कदम (अहिल्यानगर). 

विदर्भ: हेमंत संभूस (नागपूर), राजू उंबरकर (अमरावती), हेमंत गडकरी (अकोला), प्रशांत कनोजिया (यवतमाळ), बाळा शेडगे (बुलढाणा)
 

Web Title : लोगों के मुद्दों के लिए लड़ने वाली पार्टी की छवि बनाएं: राज ठाकरे

Web Summary : मनसे प्रमुख राज ठाकरे ने पार्टी को सीधे सार्वजनिक मुद्दों को संबोधित करने का निर्देश दिया। उन्होंने जिलों के लिए 'संपर्क अध्यक्ष' नियुक्त किए, उन्हें आगामी चुनावों से पहले पार्टी को मजबूत करने और स्थानीय समस्याओं को हल करने का काम सौंपा।

Web Title : Build image as party fighting for people's issues: Raj Thackeray

Web Summary : MNS chief Raj Thackeray directs party to address public issues directly. He appointed 'Sampark Adhyaksh' for districts, tasking them with strengthening the party and resolving local problems ahead of upcoming elections.