मनसेचा पुन्हा मध्य रेल्वेवर प्रहार, भरती प्रक्रियेतून मराठी हद्दपार; अमित ठाकरेंकडून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 09:52 IST2026-03-27T09:49:40+5:302026-03-27T09:52:44+5:30

MNS Amit Raj Thackeray Criticize Central Railway: जाब विचारायला, मराठी कामगारांच्या हक्कासाठी 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' मैदानात उतरेल. महाराष्ट्राच्या मातीत मराठीचा अपमान आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, असा इशारा अमित राज ठाकरे यांनी दिला.

mns amit raj thackeray criticize central railway over marathi language expelled from recruitment process | मनसेचा पुन्हा मध्य रेल्वेवर प्रहार, भरती प्रक्रियेतून मराठी हद्दपार; अमित ठाकरेंकडून निषेध

मनसेचा पुन्हा मध्य रेल्वेवर प्रहार, भरती प्रक्रियेतून मराठी हद्दपार; अमित ठाकरेंकडून निषेध

MNS Amit Raj Thackeray Criticize Central Railway: २००८ साली राज साहेबांनी आणि महाराष्ट्र सैनिकांनी रेल्वे भरतीमध्ये मराठी भाषेचा आणि भूमिपुत्रांचा हक्क मिळवण्यासाठी मोठा संघर्ष केला होता. त्यानंतर २०१७, २०१९ आणि अगदी २०२३ पर्यंत या परीक्षा मराठीत होत होत्या. मग आता अचानक रेल्वे प्रशासनाला मराठी माणसाच्या संयमाची परीक्षा का पाहायची आहे?, अशी विचारणा मनसे नेते अमित राज ठाकरे यांनी केली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून मनसेनेमध्य रेल्वेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. कोकणात जाणाऱ्यासाठी महत्त्वाची असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पूर्ववत सुरू करण्यासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या १५-२० दिवसांत मागणी मान्य न झाल्यास उत्तर प्रदेश, बिहारकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या जाऊ देणार नाही, असा थेट इशारा मनसेने दिला आहे. पूर्वी दादर ते रत्नागिरी अशी पॅसेंजर ट्रेन दिव्यावरून सोडण्यात येत असल्याने मुंबईकर कोकणवासीयांची गैरसोय होत आहे. रेल्वे प्रशासनाने कोणतेही ठोस कारण न देता हा निर्णय घेतल्याचा आरोप मनसेने केला आहे. यानंतर आता भरती प्रक्रियेत मराठी हद्दपार केल्याचा आरोप करत अमित ठाकरेंनीमध्य रेल्वेवर निशाणा साधला आहे. 

मराठी कामगारांच्या हक्कासाठी 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' मैदानात उतरेल

अमित राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट केली आहे. मध्य रेल्वे (Central Railway) प्रशासनाने १६ मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या 'GDCE 01/2026' या अधिसूचनेत Computer Based Test (CBT) परीक्षेचे माध्यम केवळ 'हिंदी आणि इंग्रजी' ठेवले आहे. मराठी भाषेला या प्रक्रियेतून जाणीवपूर्वक हद्दपार करण्याचा हा घाट घातला जात आहे. आमचा स्पष्ट इशारा आहे, त्वरीत या अधिसूचनेत बदल करून 'मराठी' भाषेचा सन्मानाने समावेश करा. अन्यथा, या अपमानाचा जाब विचारायला आणि मराठी कामगारांच्या हक्कासाठी 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' मैदानात उतरेल. लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या मातीत मराठीचा अपमान आम्ही अजिबात खपवून घेणार नाही!, असे अमित ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे. 

रेल्वे प्रशासनाला आमचे काही थेट सवाल:

- ऑगस्ट २०२५ मध्ये रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत आश्वासन दिले होते की परीक्षा १५ प्रादेशिक भाषांत होतील. मग केंद्राचा हा आदेश स्थानिक अधिकारी कचऱ्याच्या टोपलीत टाकतायत का?

- विभागीय पदोन्नतीसाठी (Departmental Exam) मराठीची 'एलर्जी' का? मराठी माणसाची प्रगती होऊ नये, अशी नेमकी कोणाची इच्छा आहे?

- महाराष्ट्राच्या जमिनीवर नोकरी करायची आणि नोकरी देताना मात्र मराठीचा विचार करायचा नाही, ही कसली दडपशाही?

जय हिंद, जय महाराष्ट्र !

 

Web Title : मनसे का मध्य रेलवे पर हमला, भर्ती प्रक्रिया से मराठी गायब।

Web Summary : मनसे ने मध्य रेलवे की भर्ती परीक्षाओं से मराठी को हटाने का विरोध किया। अमित ठाकरे ने मराठी को शामिल करने की मांग की, ऐसा न करने पर कार्रवाई की धमकी दी।

Web Title : MNS protests Central Railway's exclusion of Marathi from recruitment process.

Web Summary : MNS opposes Central Railway's decision to exclude Marathi from recruitment exams. Amit Thackeray demands inclusion, threatening action for neglecting Marathi speakers' rights in Maharashtra.