‘दादर-रत्नागिरी पॅसेंजर’वरून मनसे आक्रमक; मध्य रेल्वेचे स्पष्टीकरण, गोरखपूरला जाणारी ट्रेन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 11:37 IST2026-03-26T11:36:10+5:302026-03-26T11:37:55+5:30
Dadar Ratnagiri Passenger Train: पूर्वी दादर ते रत्नागिरी अशी पॅसेंजर ट्रेन दिव्यावरून सोडण्यात येत असल्याने मुंबईकर कोकणवासीयांची गैरसोय होत आहे.

‘दादर-रत्नागिरी पॅसेंजर’वरून मनसे आक्रमक; मध्य रेल्वेचे स्पष्टीकरण, गोरखपूरला जाणारी ट्रेन...
Dadar Ratnagiri Passenger Train: कोकणात जाणाऱ्यासाठी महत्त्वाची असलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पूर्ववत सुरू करण्यासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या १५-२० दिवसांत मागणी मान्य न झाल्यास उत्तर प्रदेश, बिहारकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या जाऊ देणार नाही, असा थेट इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. पूर्वी दादर ते रत्नागिरी अशी पॅसेंजर ट्रेन दिव्यावरून सोडण्यात येत असल्याने मुंबईकर कोकणवासीयांची गैरसोय होत आहे. रेल्वे प्रशासनाने कोणतेही ठोस कारण न देता हा निर्णय घेतल्याचा आरोप मनसेने केला आहे. यावर मध्य रेल्वेने काही मुद्दे स्पष्ट केले आहे.
दादर रत्नागिरी ही गाडी कोरोनानंतर जेव्हा चालू झाली तेव्हा २०२१ मध्ये दादर स्थानकावरून दिवा स्थानकामध्ये शिफ्ट केली गेली होती. याचे मुख्य कारण दिवास्थानकामध्ये क्रॉसिंग करत असताना इतर लोकल ट्रेनला होणारा उशीर हे होते. ही गाडी ज्यावेळेस देवस्थानकामध्ये क्रॉसिंग करते त्यावेळेस साधारणपणे सात ते आठ लोकल गाड्यांना थांबावे लागत होते त्यातून लोकलच्या वक्तशीरपणावरती दुष्परिणाम होत होता. यानंतर लोकल ट्रेनच्या संख्येमध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे. यामुळे दिव्यावरून रत्नागिरीला जाणाऱ्या ट्रेनचा वक्तशीरपणा देखील सुधारला आहे.
७ गाड्या या महाराष्ट्रातून महाराष्ट्रात जातात
लोकमान्य टिळक टर्मिनस वरून गोरखपुरला जाणारी गाडी ही दादर स्थानकामधून ऑगस्ट २०२२ पासून चालू करण्यात आली. या गाडीला लोकमान्य टिळक टर्मिनस वरून दादरवर शिफ्ट करण्यात आले होते. आपण लोकमान्य टिळक टर्मिनस ला एल एच बी कोचेसचा मुख्य डेपो बनवल्यानंतर या गाडीला दादर स्थानकामध्ये स्थलांतरित करण्यात आले होते. यावेळी या गाडीच्या कोचची संख्यादेखील २२ वरून १७ करावी लागली होती.
ही गाडी २०२२ पासून आतापर्यंत सातत्याने दादर स्थानकावरून चालवण्यात येत आहे. आता या गाडीच्या संचालनामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. १७ मार्चला एकूण १४ गाड्यांना रेगुलर टेन चा दर्जा देण्यात आलेला आहे ज्यापैकी ७ गाड्या या महाराष्ट्रातून महाराष्ट्रात जातात.
मध्य रेल्वेवर एकूण ३३ लांब पल्ल्याच्या गाड्या वाढवण्यात आल्या
मध्य रेल्वे होऊन कोकणात जाण्यासाठी सध्या एकूण २१ गाड्या प्रतिदिवशी चालवल्या जातात यापैकी सहा गाड्या ह्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून, आठ गाड्या ह्या लोकमान्य टिळक टर्मिनस वरून, एक गाडी दादर स्थानकावरून, चार गाड्या या कल्याण वरून व दोन गाड्या या दिवा स्थानकावरून चालवल्या जातात. याशिवाय याशिवाय २५ गाड्या या वसई रोड वरून पनवेल मार्गे कोंकण रेल्वेसाठी चालवल्या जातात. अशा एकूण ४६ गाड्या प्रत्येक दिवशी प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी उपलब्ध आहेत.
५२ उन्हाळी विशेष गाड्या व ३६ होळी विशेष गाड्या
या सर्व गाड्यांच्या शिवाय वेळोवेळी आवश्यकतेनुसार विशेष गाड्या देखील कोंकण रेल्वेसाठी चालविल्या जातात. मागच्या वर्षी गणेशोत्सवासाठी ३०२ विशेष गाड्या मध्य रेल्वे द्वारे चालवल्या गेल्या होत्या. मागच्या वर्षी ५२ उन्हाळी विशेष गाड्या व ३६ होळी विशेष गाड्या देखील चालवण्यात आल्या होत्या.
यावर्षी देखील आत्तापर्यंत ७२ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आलेली आहे आणि होळीसाठी एकूण १८ विशेष गाड्या चालवण्यात आलेल्या आहेत.
२०२२ नंतर कुठलीही गाडी ही रद्द करण्यात आलेली नाही.
याउलट जुलै २०२३ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव ही वंदे भारत एक्सप्रेस चालू करण्यात आलेली आहे. सप्टेंबर २०२४ पासून बांद्रा टर्मिनस वरून मडगावला आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी चालू करण्यात आलेली आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस वरून मडगावला जाणाऱ्या गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. ही गाडी पूर्वी आठवड्यातून एकदा चालवली जायची आता ती गाडी आठवड्यातून चार वेळेस चालवल्या जाते.