एमएमआरडीए : जेव्हीएलआर जंक्शन स्थानकातील शेवटच्या पाईल कॅपचे काम पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 12:40 PM2020-06-24T12:40:09+5:302020-06-24T12:41:10+5:30

हे काम पूर्ण करताना एमएमआरडीए समोर अनेक मोठी आव्हाने हाती, त्या सर्वांचा सामना करून एमएमआरडीएने हे महत्वपूर्ण ध्येय साध्य केले आहे.

MMRDA: Work on last pile cap at JVLR junction station completed | एमएमआरडीए : जेव्हीएलआर जंक्शन स्थानकातील शेवटच्या पाईल कॅपचे काम पूर्ण

एमएमआरडीए : जेव्हीएलआर जंक्शन स्थानकातील शेवटच्या पाईल कॅपचे काम पूर्ण

googlenewsNext


एमएमआरडीएचा महत्वाचा टप्पा पूर्ण 

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) २३ जून रोजी जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) जंक्शन स्टेशन (Location -P161) येथे अखेरच्या पाईल कॅपचे काम पूर्ण केले. हे काम पूर्ण करताना एमएमआरडीए समोर अनेक मोठी आव्हाने हाती, त्या सर्वांचा सामना करून एमएमआरडीएने हे महत्वपूर्ण ध्येय साध्य केले आहे.

बांधकामादरम्यान जमिनीखाली असलेल्या असंख्य वाहिन्या जसे की, तब्बल ६०० मिमी च्या २ ऑपरेशन व्हॉल्व कीज,  ३०० मिमी ची महानगर गॅस लाईन, ४५० मिमी ची मलवाहिनी आणि अशा अनेक विद्युत, फायबर आणि एमटीएनएल वाहिन्यांबद्दल माहिती मिळाली. जमिनीखाली असलेल्या अनेक वाहिन्यांची माहिती मिळाल्यानंतर पाईल कॅप कशा प्रकारे बसवता येईल याचा अभ्यास करणे एमएमआरडीए ला सोपे गेले आणि त्यानंतरचं योग्य त्या खोलीसह पाईल कॅप बसवण्यात आली. पाईल कॅप बसवण्याचे काम जमिनीच्या खोलवर जाऊन करण्याचे काम असल्यामुळे सर्वात मोठी जोखीम होती, तसेच जमिनीखालील अनेक वाहिन्या, कठीण खडके,आणि मुंबईत जागेची कमतरता यामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरून खोदकाम करून मोठमोठया यंत्रासह काम करणे खूप कठीण झाले होते. परंतु या सर्वांवर मात करत जेव्हीएलआर येथील पाईल कॅप चे काम आता पूर्ण झाले आहे. 

Web Title: MMRDA: Work on last pile cap at JVLR junction station completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.