एमएमआरडीए अधिकाऱ्यांना देणार परदेशात शिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 01:53 AM2019-11-01T01:53:02+5:302019-11-01T01:53:16+5:30

दहिसर ते डीएन नगर मेट्रो-२ अ, दहिसर ते अंधेरी पूर्व या मेट्रो-७ मार्गिकेदरम्यान सिंगापूर रॅपिड ट्रान्झिस्ट कॉर्पोरेशनच्या मदतीने नव्या तंत्रज्ञानाचा आणि कार्यप्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.

MMRDA to educate officers abroad | एमएमआरडीए अधिकाऱ्यांना देणार परदेशात शिक्षण

एमएमआरडीए अधिकाऱ्यांना देणार परदेशात शिक्षण

Next

मुंबई : मुंबई आणि मुंबईलगतच्या भागांमध्ये मेट्रोचे प्रकल्प येणार आहेत. या मेट्रो प्रकल्पांचा नियोजनात्मक पद्धतीने विकास करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सिंगापूर मास रॅपिड ट्रान्झिस्ट कॉर्पोरेशनसोबत हातमिळवणी केली आहे. त्यानुसार एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना परदेशात प्रशिक्षण मिळणार आहे.

दहिसर ते डीएन नगर मेट्रो-२ अ, दहिसर ते अंधेरी पूर्व या मेट्रो-७ मार्गिकेदरम्यान सिंगापूर रॅपिड ट्रान्झिस्ट कॉर्पोरेशनच्या मदतीने नव्या तंत्रज्ञानाचा आणि कार्यप्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. यामुळेच एमएमआरडीएच्या अधिकाºयांनी याचा अभ्यास करण्यासाठी सिंगापूर, हाँगकाँगला भेट दिली होती. सिंगापूर रॅपिड ट्रान्झिस्ट कॉर्पोरेशनसोबत झालेल्या करारानुसार काही अधिकारी-कर्मचाºयांना सिंगापूरला प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे.

Web Title: MMRDA to educate officers abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.