११ डिसेंबरपासून नागपुरात आमदार अपात्रता सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 06:44 IST2023-11-24T06:43:26+5:302023-11-24T06:44:01+5:30

सुनावणीसाठी आपल्याकडे १६  दिवस असून ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय घ्यायचा आहे

MLA disqualification hearing in Nagpur from December 11 by rahul narvekar | ११ डिसेंबरपासून नागपुरात आमदार अपात्रता सुनावणी

११ डिसेंबरपासून नागपुरात आमदार अपात्रता सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेवरील पुढील सुनावणीचे वेळापत्रक दोन्ही गटाच्या वकिलांना सांगितले. यावेळी त्यांनी २८ नोव्हेंपारसून सुनावणी पुन्हा सुरू होईल हे सांगताना ११ ते २२ डिसेंबर या काळात सुट्या वगळता नागपुरात सुनावणी चालेल हे स्पष्ट केले. अधिवेशन ७ डिसेंबरऐवजी ११ डिसेंबर हाेण्याची शक्यता आहे. याबाबत २८ किंवा २९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे विधानसभा अध्यक्षांनी नमूद केले.

सुनावणीसाठी आपल्याकडे १६  दिवस असून ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय घ्यायचा आहे, असेही नार्वेकर यांनी म्हटले. 

...तर कोर्टाला सांगावे लागेल : नार्वेकर
सुनावणी दरम्यान शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वकिलांमध्ये चांगलीच जुंपली. त्यावर हस्तक्षेप करीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लवादाचा वेळ वाया जात आहे. मला ठरावीक वेळेत हे प्रकरण निकाली काढायचे आहे. तुमच्यामुळे सुनावणीला उशीर होईल, हे मला सर्वोच्च न्यायालयाला सांगावे लागेल, अशा शब्दांत शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांना समज दिली.

मुंबईतील पुढील सुनावणी 
२८,२९ आणि ३० नोव्हेंबर 
१, २, ५, ६ आणि ७ डिसेंबर 

नागुपरात सुनावणी 
११ ते १५ डिसेंबर 
१८ ते २२  डिसेंबर

 

Web Title: MLA disqualification hearing in Nagpur from December 11 by rahul narvekar