लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मिरा-भाईंदरचा कचरा मुंबईत टाकण्यात येत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर मुंबई महापालिकेला जाग आली असून, या प्रकरणी संबंधित खासगी मालमत्ताधारक आणि कंत्राटदाराविरुद्ध गोराई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
‘मिरा-भाईंदरचा कचरा मुंबईत; गोराई, शेपली गावात दुर्गंधी’ असे वृत्त ‘लोकमत’च्या २९ मार्च रोजीच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. याबाबत महापालिकेच्या ‘आर मध्य’ विभागाच्या वतीने स्पष्टीकरण दिले आहे. शेफाली गाव परिसरात गोराई व्हिलेजर्स वेल्फेअर असोसिएशनच्या प्रतिनिधींच्या तसेच स्थानिक पोलिसांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. या ठिकाणी कचरामिश्रित माती टाकण्यात आल्याचे यावेळी आढळून आले. ही खासगी मालमत्ता असल्याचेही स्पष्ट झाले. त्यानंतर या प्रकरणी संबंधित मालमत्ताधारक आणि कंत्राटदाराविरुद्ध गोराई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या जागेवरील कचरा तत्काळ हटविण्यासाठी जमीन मालकास नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी चौकशी करून संबंधिताविरोधात कठोर कारवाई करण्याचे तसेच येथील कचरा तातडीने उचलण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची विनंती मिरा भाईंदर महापालिका आयुक्तांना करण्यात आली आहे.
Web Summary : Following a Lokmat report, Mumbai municipality acted on Mira-Bhayandar waste dumping. A case has been registered against the contractor and property owner. Notice issued to remove waste.
Web Summary : लोकमत की खबर के बाद, मुंबई नगर पालिका ने मीरा-भायंदर के कचरे के डंपिंग पर कार्रवाई की। ठेकेदार और संपत्ति मालिक के खिलाफ मामला दर्ज। कचरा हटाने के लिए नोटिस जारी।