चिंता वाढली! प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुली सोडताहेत घर; आकडेवारी काय सांगते पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 12:21 IST2025-03-18T12:20:38+5:302025-03-18T12:21:22+5:30

गेल्या वर्षभरात मुंबईत अल्पवयीन मुलींच्या अपहरणप्रकरणी १२२६ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

Minor girls are leaving home due to love affairs mumbai crime | चिंता वाढली! प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुली सोडताहेत घर; आकडेवारी काय सांगते पाहा...

चिंता वाढली! प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुली सोडताहेत घर; आकडेवारी काय सांगते पाहा...

मुंबई

गेल्या वर्षभरात मुंबईत अल्पवयीन मुलींच्या अपहरणप्रकरणी १२२६ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यापैकी ११४२ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. यामध्ये विकृतीच्या जाळ्यात अडकलेल्या मुलींसह प्रेमप्रकरणातून घर सोडलेल्या मुलींचाही समावेश आहे. 

मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात महिलांसंबधित ६ हजार ३२७ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी ५,९१८ गुन्ह्यांची उकल करण्यात आली. यामध्ये १ हजार ५० प्रकरणात मुली लैंगिक अत्याचाराच्या शिकार ठरल्या. अल्पवयीन मुलींच्या अपहरणप्रकरणी १,२२६ गुन्हे नोंदविण्यात आले. २०२३ मध्ये हाच आकडा १,१६७ होता. पोलिसांकडून बेपत्ता मुलींच्या शोधासाठी ऑपरेसन मुस्कानसह विविध मोहीम राबविण्यात येते. काही प्रकरणात क्षुल्लक कारणांतून घर सोडण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. 

समुपदेश करत कुटुंबीयांच्या ताब्यात
१. पोलिसांकडून मुलीचा शोध घेतल्यानंतर समुपदेशन करत त्यांना कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येते. 
२. पोलिसांच्या निर्भया पथकाद्वारे आतापर्यंत अनेक हरवलेल्या मुलींचा शोध घेत त्यांना कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

कुठे फूस लावून, तर कुठे प्रेम प्रकरण...
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, यातील बहुतांश मुली प्रेमप्रकरणातून पसार होत आहेत. काहींना फूस लावून पळवून नेण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. तर काही प्रकरणात क्षुल्लक कारणांतून घर सोडण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.

Web Title: Minor girls are leaving home due to love affairs mumbai crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.