खिडकीतून घरात घुसून अल्पवयीन मुलीवर विक्रोळीत अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 13:17 IST2025-05-31T13:17:09+5:302025-05-31T13:17:09+5:30

मुलगी घरामध्ये एकटी असल्याची संधी साधून आरोपीने खिडकीतून तिच्या घरात प्रवेश केला

Minor girl raped in Vikhroli Accused arrested | खिडकीतून घरात घुसून अल्पवयीन मुलीवर विक्रोळीत अत्याचार

खिडकीतून घरात घुसून अल्पवयीन मुलीवर विक्रोळीत अत्याचार

मुंबई : खिडकीतून घरात प्रवेश करत एका ३१ वर्षीय आरोपीने १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना विक्रोळीमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदवत पार्कसाइट पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० ते २९ मेदरम्यान पार्कसाइट परिसरात हा गुन्हा घडला. १७ वर्षीय पीडित मुलगी घरामध्ये एकटी असल्याची संधी साधून आरोपीने खिडकीतून तिच्या घरात प्रवेश केला. आरोपीने खिडकीतून तिच्या घरात प्रवेश केला. आरोपीने जबरदस्तीने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केला. तसेच याची वाच्यता केल्यास बदनामी करण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलीने याबाबत कोणालाही सांगितले नाही. आरोपीकडून अत्याचार वाढल्याने अखेर तिने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला.
 

Web Title: Minor girl raped in Vikhroli Accused arrested