Join us

क्रूर लैंगिक अत्याचारानंतर मालवणीत चिमुरडीची हत्या, आईसह प्रियकराला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 15:09 IST

शवविच्छेदनानंतर रूग्णालयातून पोलिसांना खबर देण्यात आली. चिमुरडीला झालेल्या गंभीर जखमा पाहून पोलिसांनाही धक्का बसला. पोलिसांनी ३० वर्षीय आईसह तिच्या १९ वर्षीय प्रियकराला ताब्यात घेतले. चौकशीअंती त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

मुंबई : आईच्या प्रियकरानेच अडीच वर्षांच्या चिमुरडीवर क्रूरपणे लैंगिक अत्याचार करत हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे वेदनेने तडफडणाऱ्या चिमुकलीचे आईनेच पाय पकडले. एवढ्यावरच न थांबता चिमुरडीचा आक्रोश थांबविण्यासाठी तोंड उशीने दाबले. त्यानंतर मुलीने प्राण सोडले. मन हेलावणाऱ्या या घटनेने मालवणी परिसर हादरला आहे.

शवविच्छेदनानंतर रूग्णालयातून पोलिसांना खबर देण्यात आली. चिमुरडीला झालेल्या गंभीर जखमा पाहून पोलिसांनाही धक्का बसला. पोलिसांनी ३० वर्षीय आईसह तिच्या १९ वर्षीय प्रियकराला ताब्यात घेतले. चौकशीअंती त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

वासनांध प्रियकर!विकृत आईला पतीने सोडल्यानंतर ती घरकाम करून उदर्निर्वाह करत होती. तिची १९ वर्षीय तरुणासोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. घरी येणे-जाणे वाढले. रविवारी प्रियकर घरी आला. प्राथमिक चौकशीत प्रियकराची वासना भागवण्यासाठी आईने चिमुरडीला पुढे केल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून, याबाबत पोलिस दोघांकडे कसून चौकशी करत आहेत. 

फीट आल्याचा बहाणा मुलगी निपचित पडल्याने तिला घेऊन महिलेने जवळचे रुग्णालय गाठले आणि तेथे फीट आल्याने ती पडल्याचे सांगितले. मात्र, मुलीची अवस्था बघून डॉक्टरांना संशय आला. शरीरावरील चावल्याच्या गंभीर जखमा बघून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. त्यात लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट होताच, या गुन्ह्याला वाचा फुटली.

टॅग्स :गुन्हेगारीपोलिस