मंत्रालय आजपासून पाच दिवस बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 05:28 IST2023-09-28T05:27:40+5:302023-09-28T05:28:03+5:30

पाच दिवसांच्या आठवड्यामुळे अनेक सरकारी कार्यालये शनिवार, रविवारी बंद असतील.

Ministry closed for five days from today | मंत्रालय आजपासून पाच दिवस बंद

मंत्रालय आजपासून पाच दिवस बंद

मुंबई : राज्य सरकारने उद्या,  शुक्रवारी ईद-ए-मिलादची शासकीय सुटी जाहीर केल्याने मंत्रालय सलग पाच दिवस बंद राहणार आहे. अनंत चतुर्दशीमुळे ईदची सुटी एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. तशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आली हाेती.

पाच दिवसांच्या आठवड्यामुळे अनेक सरकारी कार्यालये शनिवार, रविवारी बंद असतील. साेमवारी गांधी जयंतीची सुटी आहे. त्यामुळे थेट पाच दिवसांनंतर म्हणजेच मंगळवारी सरकारी कार्यालये सुरू हाेतील.

Web Title: Ministry closed for five days from today