भर समुद्रात मांडवाहून मुंबईकडे येताना स्टाफसह अडकले मंत्री उदय सामंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 07:33 IST2023-01-21T07:33:07+5:302023-01-21T07:33:42+5:30
स्पीड बोट बंद पडली, सुखरूप किनाऱ्यावर

भर समुद्रात मांडवाहून मुंबईकडे येताना स्टाफसह अडकले मंत्री उदय सामंत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत रायगड जिल्ह्यातील मांडवाहून स्पीड बोटीने मुंबईतील गेट वे ॲाफ इंडियाकडे निघाले असताना भर समुद्रात त्यांची बोट बंद पडली. त्यांच्यासोबत असलेल्या पीएच्या प्रसंगावधानामुळे सामंत आणि त्यांच्याबरोबर असलेला त्यांचा स्टाफ सुखरूप मुंबईत पोहोचले.
शुक्रवार संध्याकाळी सामंत हे अलिबाग येथील कार्यक्रम आटोपून मुंबईकडे निघाले. बोटीने प्रवास करत असताना भर समुद्रातच स्पीड बोट बंद पडली. बोटीची सर्वच यंत्रणा ठप्प झाली होती. बोटीच्या कॅप्टनला मदतीसाठी आपत्कालीन संदेश पाठवणेही शक्य होत नव्हते. लाटांमुळे सामंत यांची बोट भरकटू लागली होती. प्रसंगावधान राखत सामंत यांच्या पीएंनी मोबाइलला रेंज नसतानाही प्रयत्न करून दुसरी बोट मागवली.