Join us
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या मुद्दयावरुन राज्यमंत्री बच्चू कडूंनी अब्दुल सत्तारांना झिडकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 21:21 IST

आळंदी येथे वारकऱ्यांच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलतानी बच्चू कडू यांनी शेतकरी

मुंबई - महाविकास आघाडीच्या सरकारने केलेली दोन लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं असल्याची टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली होती. त्यांच्या या विधानाने महाविकास आघाडीमधील नेते नाराज असल्याचे बोलले जात आहे. तर बच्चू कडू यांना दोन लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं असल्याचं वाटत असेल त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे, असा टोला राज्यमंत्री व शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी लगावला होता. त्यावर, आता बच्चू कडू यांनी उत्तर दिलंय. 

आळंदी येथे वारकऱ्यांच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलतानी बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीवर भाष्य केलं होत. सरकारच्या धोरणांमुळे जे शेतकऱ्याच नुकसान झालं आहे ते अगणित आहे. त्याचा आपण अंकात विचार करू शकत नाही. तसेच माझ्या मते दोन लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं आहेत, असं विधान कडू यांनी केलं होतं. यावरून बोलताना अब्दुल सत्तार यांनी बच्चू कडूंना लक्ष्य केलं.  मराठवाड्यातील आणि विदर्भातील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा 80 टक्के फायदा होणार आहे. तसेच ही कर्जमाफीअंतिम नसून, हा पहिला टप्पा आहे. शासनाच्या तिजोरीत जसा-जसा पैसा येईल तसे शेतकऱ्यांच्या बाबतीत आणि कर्जमाफीबद्दल निर्णय घेतली जाणार आहे. मात्र असे असूनही, बच्चू कडू ज्या सरकारमध्ये आहे त्या सरकारची कर्जमाफी त्यांना बुजगावणं असल्याचं वाटत असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे, असा खोचक सल्ला सत्तार यांनी दिला. त्यानंतर, आता सत्तार यांचा तो अधिकार नाही, असे म्हणत बच्चू कडूंनी सत्तारांना झिडकारले आहे. 

अब्दुल सत्तारांच्या प्रतिक्रियेवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी उत्तर दिलंय. कशाबद्दल बाहेर पडावं हे स्पष्ट सांगाावं, मग त्यांच्या सूचनेनुसार आपण मान्य करू. सरकारकडे माहिती पोहोचवणे हा गुन्हा नाही, किंवा सरकारच्या विरोधातही नाही. आमदार किंवा राज्यमंत्री म्हणून वस्तुस्थिती सरकारपर्यंत पोहोचवणे हे आमचं कामच आहे, असे कडू यांनी म्हटले. विशेष म्हणजे, सत्तारांना तो अधिकारच नाही, त्यांनी त्यांचा तपासून घ्यावं मग काय ते पाहू असंही कडू यांनी म्हटलंय.  

टॅग्स :मुंबईशेतकरीबच्चू कडूअब्दुल सत्तार