Join us
Daily Top 2Weekly Top 5

सहन होत नाही, सांगताही येत नाही अशी ठाकरेंची अवस्था; शंभूराज देसाईंचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 15:45 IST

राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

मुंबई- राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आता राज्य सरकारकडून पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. पण अनेक ठिकाणी पंचनामे होऊनही आर्थिक मदत पोहोचली नसल्याचा आरोप होत आहे. याबाबत आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करत निशाणा साधला. यावर शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

"नुसतंच बाळासाहेबांचे विचार"; राज ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल

"ज्यांची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी अवस्था उद्धव ठाकरे यांची झाली आहे, असा टोला मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. मंत्री देसाई म्हणाले,  उद्धव ठाकरेंच्या काळातही संकट आली, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. पण एनडीआरएफच्या दुप्पट मदत द्यायची, दोन हेक्टचा तीन हक्टर करण्याचा निर्णय घेतला. हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. आता स्वत: मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत, अजितदादाही लक्ष ठेऊन आहेत.  

"शेजारच्या राज्यातील नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना येण्यासाठी विनंती केली. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एका दिवसासाठी तिथे गेले आहेत, असंही मंत्री देसाई म्हणाले. पुढं बोलताना देसाई म्हणाले, उद्धव ठाकरेंना मला विचारायचं आहे, तुम्ही मुख्यमंत्री असताना कोकणात अतिवृष्टी झाली होती, मोठे नुकसान झाले होते त्यावेळी तुमचे मंत्रीच अगोदर तिथे गेले होते. अतिवृष्टी झाली आणि तुम्ही लगेच तिथे गेलात अस नाही झाले,असा पलटवार मंत्री शंभूराज देसाई यांनी केली. 

" उद्धव ठाकरे म्हणाले पाच जिल्ह्यात एक दिवस पाहणी दौरा करणार, पाच जिल्ह्यात एक दिवस दौरा कसा करणार तुम्ही? तुम्हाला जे कोण सांगत आहेत त्यांच्यामुळे आज ही अवस्था झाली आहे, तुम्ही शिंदे साहेबांना जे शब्द वापरता ते आम्ही बोलूही शकत नाही. पण तुम्ही असा शब्द वापरला तर आम्हालाही तेवढ्याच तीव्रतेने बोलावे लागेल, असा इशाराही शंभूराज देसाई यांनी दिला. 

टॅग्स :शंभूराज देसाईउद्धव ठाकरेशिवसेनाएकनाथ शिंदे