Join us  

"महाराष्ट्रात तिघाडी सरकारमध्ये बिघाडी झाली आहे; काँग्रेसने राज्य सरकारचा पाठिंबा काढावा"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 1:27 PM

काँग्रेसच्या या नाराजीनंतर महाराष्ट्रात तिघाडी सरकारमध्ये बिघाडी झाली असल्यचा टोला रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री डॉ. रामदास आठवले यांनी लगावला आहे.

मुंबई: राज्य सरकारच्या निर्णय प्रक्रियेत घेतलं जात नसल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी असल्याचे खुद्द पक्षाचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. तसेच याआधी देखील याआधी काँग्रेसच्या नेत्यांनी महत्त्वाच्या निर्णयांमध्ये आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही अशी तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. मात्र यानंतर देखील काँग्रेसच्या मंत्र्यांच्या अनुभवाचा फायदा घेतला जात नसल्यामुळे बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या या नाराजीनंतर महाराष्ट्रात तिघाडी सरकारमध्ये बिघाडी झाली असल्यचा टोला रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री डॉ. रामदास आठवले यांनी लगावला आहे.

"तुम्हाला रस्त्यावर फोडून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही"; मनसेने दिला इशारा

रामदास आठवले ट्विट करत म्हणाले की, महाराष्ट्रात तिघाडी सरकारमध्ये बिघाडी झाली आहे. काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. मात्र काँग्रेसला विश्वासात घेतले जात नसल्याची नाराजी काँग्रेसने व्यक्त केली आहे. त्यामुळे काँग्रेसला विश्वासात घेतले जात नसेल तर त्यांनी राज्य सरकारचा पाठिंबा काढावा, असं आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे. 

राज्यातील सध्याच्या संकटाच्या काळात घेतले जाणारे विविध निर्णय तिन्ही पक्षांनी चर्चा करुन घेणं काँग्रेसला अपेक्षित आहे. मात्र निर्णय घेताना आणि मंत्रिमंडळाच्या निर्णय प्रकियेत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसून येते आहे. तसेच विधान परिषदेत एक जागा कमी मिळाली तेव्हा ही काँग्रेस नाराज झाली. आता निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जात नसल्याने काँग्रेस पुन्हा नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.

विधान परिषदेच्या १२ रिक्त जागांचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, या पक्षांत समसमान वाटप झाले पाहिजे. शिवाय, विविध महामंडळांच्या नेमणुकादेखील समान झाल्या पाहिजेत, यावरूनही महाविकास आघाडीतील मतभेद आता समोर येऊ लागले आहेत.

मंत्रीपदाचे वाटप आमदारांच्या संख्येनुसार झाले असले तरी भविष्यातील सर्व वाटप समसमान असेल, असे याआधी अनेकदा ठरले होते. विधान परिषदेच्या जागा तिन्ही पक्षांनी समान वाटून घ्यायच्या, असा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला होता. मात्र असे असताना आता ५ जागा शिवसेनेला, ४ जागा राष्ट्रवादीला आणि ३ जागा काँग्रेसला, असा प्रस्ताव काँग्रेसकडे पाठविण्यात आला आहे. त्यावरून काँग्रेसमध्ये नाराजी आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जे ठरले होते त्याचे पालन झाले पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांना भेटून सांगण्यात येईल, असे एका ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले आहे. 

CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक; धडकी भरवणारी आकडेवारी

वंश-धर्माच्या आधारावर फूट पाडणारे स्वतःला राष्ट्रवादी म्हणताहेत; राहुल गांधींचा ट्रम्प-मोदींवर निशाणा

टॅग्स :रामदास आठवलेकाँग्रेसमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकारउद्धव ठाकरेशरद पवारबाळासाहेब थोरात