गिरणी कामगारांना मिळणार साडेनऊ लाखात घरे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 01:15 AM2020-02-29T01:15:09+5:302020-02-29T01:15:14+5:30

सरकारी किमतीला कामगारांनी केला होता विरोध

Mill workers will get houses in one and a half lakhs | गिरणी कामगारांना मिळणार साडेनऊ लाखात घरे

गिरणी कामगारांना मिळणार साडेनऊ लाखात घरे

googlenewsNext

मुंबई: गिरणी कामगारांसाठी काढण्यात येणाऱ्या घरांची किंमत कमी करण्याची मागणी गिरणी कामगारांच्या संघटनेनुसार करण्यात आली होती. यानुसार, आता अठरा लाख किंमत ठरलेली घरे गिरणी कामगारांना निम्या किंमतीत मिळणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गिरणी कामगार शिष्टमंडळाला आश्वासन दिले आहे.

एक मार्च रोजी गिरणी कामगारांच्या घरांची सोडत काढण्यात येणार आहे. स्वस्तात घरे देण्याचा निर्णय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतला आहे. त्यामुळे गिरणी कामगारांना आता साडेनऊ लाखांतच घर मिळणार असल्याची, माहिती संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी दिली.

गिरणी कामगारांच्या घरांची किंमत वाढून अठरा लाख रूपये करण्यात आली होती. इतकी महाग घरे गिरणी कामगार घेऊ शकत नाही. यासंदर्भात गिरणी कामगारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.

सदर रक्कम गिरणी कामगारांना भरणे शक्य नसल्यामुळे घरांची किंमत कमी करण्यासाठी गिरणी कामगार सेना व शिवसेना आमदार अजय चौधरी यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटून घराची किंमत साडेनऊ लाख रूपये करून गिरणी कामगारांना दिलासा देण्याची मागणी केली होती.

मुख्यमंत्र्यांना विनंती
गिरणी कामगारांसाठी घरे आणि त्यांच्या किमती राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र या किमतींमध्ये घरे घेणे परवडणारे नसून यासाठी सरकारने तातडीने बैठक घ्यावी, अशी विनंती गिरणी कामगार कृती समितीने केली होती.

Web Title: Mill workers will get houses in one and a half lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.