म्हाडाची ‘मास्टर’ घरे लाटली; १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल! बनावट यादी, कागदपत्रांद्वारे घेतला लाभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 10:20 IST2025-08-05T10:20:28+5:302025-08-05T10:20:47+5:30
भूसंपादन यादीतील बनावट नावे आणि कागदपत्रांच्या आधारे १९ जणांनी म्हाडाची घरे मिळवल्याचे समोर आले असून, याप्रकरणी म्हाडाच्या तक्रारीनंतर खेरवाडी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

म्हाडाची ‘मास्टर’ घरे लाटली; १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल! बनावट यादी, कागदपत्रांद्वारे घेतला लाभ
मुंबई : म्हाडाच्या मास्टर लिस्टमधील घरे लाटण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या असून, यात सातत्याने गैरव्यवहार होत असल्याचे आरोप केले जात असतानाच आता पुन्हा मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळात मास्टर लिस्टच्या घरांच्या वाटपात गैरव्यवहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. भूसंपादन यादीतील बनावट नावे आणि कागदपत्रांच्या आधारे १९ जणांनी म्हाडाची घरे मिळवल्याचे समोर आले असून, याप्रकरणी म्हाडाच्या तक्रारीनंतर खेरवाडी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
घरे लाटल्याप्रकरणी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मिळकत व्यवस्थापक अवधूत बेळणेकर (४४) यांनी तक्रार केली. बनावट दस्तऐवज, यादी सादर करून घरांचा लाभ घेतल्याच्या आरोपाप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी १ ऑगस्ट रोजी सुरेश चिकणे, फातिमा लुईस, युसुफ मोहम्मद अमीन साकीनाबी अमिन सय्यद, गंगाराम सकपाळ, शालिनी कवटेकर, हाजरा मलिक, तानाजी तावडे, लक्ष्मण दळवी, आयेशा शेख, पीयूष शशिकांत दोशी, दिलीप बने दीप्ती बने, हिराबाई कदम, युसुफ कुर्बान जावरावाला, लक्ष्मण दळवी, राजेश दळवी, दत्ताराम फाटक, बबन डोंगरे, नामदेव फाटक, बाला रावजी भोसले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.