मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ठाणे शहर व जिल्हा, वसई (जि. पालघर) येथील गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ५,२८५ सदनिका ओरोस, कुळगाव-बदलापूर येथील ७७ भूखंड विक्रीकरिता लॉटरीसाठी अखेरच्या दिवसापर्यंत १ लाख ७४ हजार १६८ अर्ज आले असून, १ लाख ३९ हजार १२३ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली. स्वीकृत अर्जाची प्रारूप यादी २२ सप्टेंबरला प्रसिद्ध होईल.
२४ सप्टेंबरला दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. पात्र अर्जदारांची अंतिम यादी ७ ऑक्टोबरला प्रसिद्ध होईल.
२० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ५६५ सदनिका, १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत ३००२ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहे त्या स्थितीमध्ये या योजनेअंतर्गत १६७७ सदनिका, म्हाडा कोकण मंडळ योजनेअंतर्गत (५० टक्के परवडणाऱ्या सदनिका) ४१ सदनिका विक्रीसाठी आहेत. तर अर्ज नोंदणी, अर्ज भरणा प्रक्रियेला १२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती.
अनामत रकमेसह प्राप्त पात्र अर्जाची लॉटरी ९ ऑक्टोबरला ठाणे येथे काढण्यात येणार आहे.