राज्यात ‘म्हाडा’ १९ हजार ४९७ घरे बांधणार, मुंबई मंडळांतर्गत बांधली जाणार ५ हजार १९९ घरे; १५,९५६.९२ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 11:04 IST2025-04-01T11:03:50+5:302025-04-01T11:04:02+5:30

Mumbai News: म्हाडाच्या अर्थसंकल्पात मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या मंडळांमार्फत १९ हजार ४९७ घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात ९२०२.७६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. म्हाडाचा २०२५-२०२६ चा अर्थसंकल्प प्राधिकरणास सादर करण्यात आला.

MHADA to build 19,497 houses in the state, 5,199 houses to be built under Mumbai Board; Budget of Rs 15,956.92 crore approved | राज्यात ‘म्हाडा’ १९ हजार ४९७ घरे बांधणार, मुंबई मंडळांतर्गत बांधली जाणार ५ हजार १९९ घरे; १५,९५६.९२ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

राज्यात ‘म्हाडा’ १९ हजार ४९७ घरे बांधणार, मुंबई मंडळांतर्गत बांधली जाणार ५ हजार १९९ घरे; १५,९५६.९२ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

 मुंबई - म्हाडाच्या अर्थसंकल्पात मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या मंडळांमार्फत १९ हजार ४९७ घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात ९२०२.७६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. म्हाडाचा २०२५-२०२६ चा अर्थसंकल्प प्राधिकरणास सादर करण्यात आला. प्राधिकरणाच्या २०२५-२०२६ च्या १५९५६.९२ कोटींच्या अर्थसंकल्पाला व २०२४-२५ च्या १०९०१.०७ कोटी रुपयांच्या सुधारित अर्थसंकल्पाला प्राधिकरणाची मंजुरी मिळाली.
मुंबई मंडळांतर्गत ५१९९ घरे बांधली जातील. त्यासाठी ५७४९.४९ कोटी रुपयांची तरतूद आहे. 

निधीची तरतूद किती?
कोकण मंडळांतर्फे ९९०२ घरे बांधली जातील. त्यासाठी १४०८.८५ कोटी, पुणे मंडळांच्या १८३६ घरांसाठी ५८५.९७ कोटी, नागपूर मंडळांच्या ६९२ घरांसाठी १००९.३३ कोटींची तरतूद आहे. तर छत्रपती संभाजीनगर मंडळांतर्गत १६०८ घरे बांधली जाणार आहेत. यासाठी २३१.१० कोटींची तरतूद केली आहे.  

वरळी, नायगाव, परळ बीडीडी चाळींच्या पुनर्विकास योजनेसाठी २८०० कोटी
जोगेश्वरी पूर्व येथील पीएमजीपी कॉलनी पुनर्विकास प्रकल्पासाठी ३५० कोटी
वांद्रे पश्चिम येथील परिध खाडी पुनर्विकास प्रकल्पासाठी २०५ कोटी
गोरेगाव सिद्धधार्थ नगर येथे सदनिका उभारणीसाठी ५७३ कोटी
परळ येथील जिजामाता नगर येथील भूखंडावर मुले व मुलींच्या निवासासाठी वसतिगृह उभारणीसाठी २० कोटी
गिरणी कामगारांच्या घरासाठी 
५७.५० कोटी रुपये
बोरीवली सर्वे क्रमांक १६० वरील योजनेसाठी २०० कोटी
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील पुनर्वसन प्रकल्पासाठी २०० कोटी
पहाडी गोरेगाव प्रकल्पासाठी 
१७७.७९ कोटी रुपये
मालवणी झोपडपट्टी सुधार प्रकल्पासाठी ५० कोटी
मागाठाणे बोरीवली योजनेसाठी ८५ कोटी
एक्सर बोरीवली तटरक्षक दल योजनेसाठी ३० कोटी
गोरेगाव सिद्धधार्थ नगर (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पासाठी २० कोटी
पाचपाखाडी-ठाणे सावरकर नगर येथे दोन मजल्यांचे हेल्थ केयर सेंटर व निवासी घरकुल योजनेसाठी १५ कोटी
माजिवाडे-ठाणे विवेकानंद नगर येथे १०० बेडचे वृद्धाश्रम व काम करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह उभारणीसाठी 
३० कोटी
विरार बोळींज येथे क्लब हाऊस, जलतरण तलाव व भूखंड विकसित करणे कामासाठी ३३.८५ कोटी
वर्तकनगर-ठाणे पोलीस वसाहत इमारतींचा पुनर्विकास कामासाठी 
९० कोटी
गोठेघर प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) योजनेसाठी ११५ कोटी
चंद्रपुर विशेष नियोजन प्राधिकरण योजनेसाठी ३७१.२० कोटी आणि टेक्सटाइल पार्क एम्प्रेस मिल योजनेसाठी ३५० कोटी रुपये तरतूद आहे.

 

Web Title: MHADA to build 19,497 houses in the state, 5,199 houses to be built under Mumbai Board; Budget of Rs 15,956.92 crore approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.