Mhada Lottery: म्हाडाने घरांच्या किमती दीड लाखाने कमी केल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 18:58 IST2025-05-22T18:57:24+5:302025-05-22T18:58:28+5:30

Mhada Lottery 2025: म्हाडाने शिरढोण व खोणी येथील ६ हजार २४८ सदनिकांची विक्री किंमत कपात केली.

MHADA reduced house prices by 1.5 lakh! | Mhada Lottery: म्हाडाने घरांच्या किमती दीड लाखाने कमी केल्या!

Mhada Lottery: म्हाडाने घरांच्या किमती दीड लाखाने कमी केल्या!

सचिन लुंगसे, लोकमत न्यूज नेटवर्क: म्हाडाने २०२४ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटातील सदनिकांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर काढण्यात आलेल्या लॉटरीतील शिरढोण व खोणी येथील ६ हजार २४८ सदनिकांची विक्री किंमत कमी करण्यात आली आहे.

म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी शिरढोण येथील सदनिकांच्या सुधारित विक्री किंमत प्रस्तावास मान्यता दिली आहे. या मान्यतेनुसार कोकण मंडळाच्या ऑक्टोबर २०२४ मधील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेतील ठाणे जिल्ह्यातील शिरढोण येथील अत्यल्प उत्पन्न गटातील ५२३६ सदनिकांची विक्री किंमत प्रती सदनिका १ लाख ४३ हजार ४०४ रुपयांनी कमी करण्यात आली. सदनिकेची सुधारित विक्री किंमत आता १९ लाख २८ हजार ७४२ रुपये आकरण्यात येणार आहे.

ऑक्टोबर २०२४ मधील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावरील खोणी येथील अत्यल्प उत्पन्न गटातील १०१२ सदनिकांची विक्री किंमत प्रती सदनिका १ लाख १ हजार ८०० रुपयांनी कमी करण्यात आली. सदनिकेची सुधारित विक्री किंमत आता १९ लाख ११ हजार ७०० रुपये आहे.

Web Title: MHADA reduced house prices by 1.5 lakh!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.