MHADA Lottery: म्हाडाच्या ११८ घरांची नोंदणी सुरु; ४८ तासांत १०% रक्कम भरा, नाहीतर घर अन् अनामत रक्कमेला मुकाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 21:25 IST2026-02-16T21:25:27+5:302026-02-16T21:25:27+5:30

Mumbai MHADA Lottery 2026: ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ पासून सुरू होणार

MHADA Lottery Registration for 118 Houses in Mumbai Starts Tomorrow No Agents Appointed | MHADA Lottery: म्हाडाच्या ११८ घरांची नोंदणी सुरु; ४८ तासांत १०% रक्कम भरा, नाहीतर घर अन् अनामत रक्कमेला मुकाल!

MHADA Lottery: म्हाडाच्या ११८ घरांची नोंदणी सुरु; ४८ तासांत १०% रक्कम भरा, नाहीतर घर अन् अनामत रक्कमेला मुकाल!

MHADA Lottery : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील विविध वसाहतींमधील ११८ सदनिका ‘प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य’या तत्त्वावर विकल्या जाणार आहेत. यासाठी म्हाडाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ पासून सुरू होणार आहे. यापूर्वी सोडतीद्वारे विक्रीसाठी जाहीर करण्यात आलेल्या मात्र विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या सदनिकांचा यात समावेश आहे. 

'प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध सदनिकांसाठी अर्जदारांनी अर्ज करण्याकरिता संकेतस्थळावर प्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज सादर करणे, अनामत रक्कम भरणे, अर्ज शुल्क भरणा, योजना/सदनिका निश्चिती करणे या प्रक्रियेला ४ मार्च रोजी सकाळी ११ पासून सुरुवात होणार आहे. सदनिकेच्या विक्री किंमतीच्या १० टक्के रकमेचा भरणा सदनिका निश्चिती केल्यानंतर ४८ तासांच्या आत अर्जदाराने करणे आवश्यक आहे.    

तर दावा आपोआप रद्द 

अर्जदार यांनी सदनिकेची निश्चिती केल्यानंतर ऑनलाईन पध्दतीने सदनिकेच्या विक्री किंमतीच्या १० टक्के रक्कम ४८ तासांच्या आत भरणे आवश्यक असेल. या कालावधीमध्ये रक्कमेचा भरणा न केल्यास सदनिकेवरचा दावा आपोआप रद्द समजण्यात येईल. भरणा केलेली अनामत रक्कम मंडळाकडे जमा करण्यात येईल.

अनधिकृत व्यक्तीशी व्यवहार 
सदनिकांच्या वितरणासाठी किंवा याबाबतच्या कोणत्याही कामासाठी कोणालाही प्रतिनिधी / सल्ला देणारा वा प्रॉपर्टी एजंट म्हणून नियुक्त केलेले नाही. अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी परस्पर पैशांचा व्यवहार केल्यास त्याला प्राधिकरण जबाबदार राहणार नाही, असे म्हाडाने म्हटले आहे.  

कुठे तक्रार कराल 

अर्जदारास कोणी दलाल / व्यक्ती परस्पर अर्ज विक्री किंवा म्हाडाच्या नावे पैसे उकळणे किंवा फसवणूक करणे या बाबी करताना आढळल्यास म्हाडाच्या मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी यांच्याशी यांच्याशी संपर्क साधावा. 

कुठे किती घरे 

शिंपोली कांदिवली ८
चारकोप सेक्टर-८ कांदिवली १ 
अँटॉप हिल-वडाळा २७
तुंगा पवई येथील ४२ 
पीएमजीपी मानखुर्द १
मालवणी मालाड १ 
गायकवाड नगर मालवणी-मालाड १ 
एकूण ८२ 

विकास नियंत्रण नियमावली ३३(५)(७) ५८ अंतर्गत मंडळाला प्राप्त सदनिका
घाटकोपर पूर्व २ 
कन्नमवार नगर विक्रोळी १ 
अँटॉप हिल-वडाळा ८ 
भायखळा ६ 
ताडदेव ६
लोअर परळ ४ 
सायन २ 
जेव्हीपीडी अंधेरी पश्चिम ७ 
एकूण ३६

Web Title : MHADA: 118 घरों के लिए पंजीकरण शुरू, तुरंत भुगतान करें!

Web Summary : MHADA पहली आओ, पहले पाओ के आधार पर 118 घर दे रहा है। पंजीकरण 17 फरवरी से शुरू। 48 घंटों के भीतर 10% भुगतान करके अपना घर सुरक्षित करें, अन्यथा जमा राशि खो दें।

Web Title : MHADA: Register for 118 homes now, pay fast or lose out!

Web Summary : MHADA offers 118 homes on a first-come, first-served basis. Registration starts February 17th. Secure your home by paying 10% within 48 hours, or risk losing it and your deposit.