Join us
Daily Top 2Weekly Top 5

MHADA Lottery 2026: मार्चमध्ये म्हाडाची तीन हजार घरांची लॉटरी, पुण्यासह कोकण मंडळाचीही घरे विक्रीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 10:33 IST

MHADA Lottery 2026 News: दरवर्षी म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई पालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर म्हाडाच्या मुंबई मंडळाने सुमारे तीन हजार घरांची लॉटरी काढण्याची तयारी सुरू केली आहे.

मुंबई - दरवर्षी म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई पालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर म्हाडाच्या मुंबई मंडळाने सुमारे तीन हजार घरांची लॉटरी काढण्याची तयारी सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही लॉटरी मार्चमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. या कालावधीत म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सुमारे ४ हजार घरांची लॉटरी काढली जाणार आहे.

नऊ लाख परवडणारी घरेगेल्या ७६ वर्षांत म्हाडाने राज्यात सर्वसामान्याना सुमारे नऊ लाख परवडणारी घरे दिली आहेत. बी.डी.डी. चाळ, मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प, जी.टी.बी. नगर येथील पंजाबी कॉलनी, पत्राचाळ, अभ्युदय नगर, पूनम नगर, अंधेरीतील सरदार वल्लभभाई पटेल नगर आदी प्रकल्प नियोजनाच्या टप्प्यात आहेत.

या घरांना चांगला प्रतिसाद१. मुंबई मंडळाच्या घरांना सर्वाधिक मागणी असते, तर कोकण मंडळाच्या घरांनाही चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र कोकण मंडळाच्या काही प्रकल्पांच्या परिसरात अद्याप पायाभूत सुविधा पूर्णपणे विकसित झाल्या नाहीत. त्यामुळे येथील घरांबाबत लॉटरीनंतर नाराजी असते.

२. प्राधिकरणाने रस्ते, पाणी, वीज आदी पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य दिले असून, घरांच्या किमतीही कमी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे पुढील लॉटरीत कोकण मंडळाच्या घरांना चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : MHADA Lottery in March: 3,000 Mumbai & Konkan Homes Available

Web Summary : Mumbai MHADA will launch a lottery for 3,000 homes in March after the election code of conduct ends. The Konkan board will also offer 4,000 homes. MHADA has provided nine lakh affordable houses in 76 years, prioritizing infrastructure and lower prices for better response.
टॅग्स :म्हाडा लॉटरीमुंबईकोकणसुंदर गृहनियोजन