म्हाडाची घरे ५ हजार; अर्ज आले ४१ हजार, २१ हजारांचे डिपॉझिट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:41 IST2025-08-06T13:40:26+5:302025-08-06T13:41:33+5:30
ठाणे शहर व जिल्हा, वसई (जि. पालघर) येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत ५ हजार २८५ घरे व ओरोस (जि. सिंधुदुर्ग), कुळगाव-बदलापूर येथील ७७ भूखंड आहेत.

म्हाडाची घरे ५ हजार; अर्ज आले ४१ हजार, २१ हजारांचे डिपॉझिट
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाची ५ हजार २८५ घरे आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी आतापर्यंत ४० हजार ८२३ अर्ज दाखल झाले असून, यापैकी २१ हजार ६१ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे. या लॉटरीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ ऑगस्टच्या रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे.
ठाणे शहर व जिल्हा, वसई (जि. पालघर) येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गत ५ हजार २८५ घरे व ओरोस (जि. सिंधुदुर्ग), कुळगाव-बदलापूर येथील ७७ भूखंड आहेत. १४ जुलै रोजी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ ‘गो-लाइव्ह’ कार्यक्रमांतर्गत करण्यात आला होता. मुंबईच्या जवळच घरे असल्याने त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, म्हाडा अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून रोख रकमेची मागणी केली जात नाही. सदनिकांच्या विक्रीकरिता प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाहीत. अर्जदाराने दलालांना बळी पडू नये, असे आवाहन म्हाडाने
केले आहे.
२० टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत एकूण ५६५ घरे
१५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेंतर्गत ३००२ घरे
म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहे त्या स्थितीमध्ये या योजनेंतर्गत १६७७ घरे
म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेंतर्गत (५० टक्के परवडणाऱ्या सदनिका) ४१ घरे