मुंबई : मुंबई मेट्रो प्रकल्प मुंबईकरांसह, महाराष्ट्रासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पातील कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.अंधेरीतील प्रस्तावित गुंदवली मेट्रो स्थानक, कांदिवली मेट्रो स्टेशन, दहीसर येथील मेट्रो फ्लायओव्हर, डी. एन. नगर मेट्रो स्थानकाच्या कामांची रविवारी मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. चारकोप येथे त्यांनी मेट्रो ट्रायल रनच्या तयारीचीही पाहणी केली. त्यानंतर कामे दर्जेदार, वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. मुख्यमंत्र्यांसह यावेळी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह आदी उपस्थित होते.
मेट्रोची कामे दर्जेदार, वेळेत पूर्ण करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 06:10 IST