Metro service closed on Sunday; Canceled service to support public curfew | रविवारी मेट्रो सेवा राहणार बंद; जनता कर्फ्यूला पाठिंबा देण्यासाठी सेवा रद्द 

रविवारी मेट्रो सेवा राहणार बंद; जनता कर्फ्यूला पाठिंबा देण्यासाठी सेवा रद्द 

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी २२ मार्चला 'जनता कर्फ्यू' लागू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी आता वर्सोवा ते घाटकोपर या मार्गावरील मेट्रो सेवा रविवारी बंद ठेवण्याचा निर्णय मेट्रो वन प्रशासनानेही
घेतला आहे.

मेट्रो वन प्रशासनाकडून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी घरातच थांबून सामाजिक साखळी तोडून गर्दी करू नये, यासाठी मेट्रोने हा निर्णय घेतला आहे. तसेच नागरिकांनी देखील 'जनता कर्फ्यू'ला पाठिंबा देण्यासाठी घरातच राहावे, अशी विनंती देखील करण्यात आली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Metro service closed on Sunday; Canceled service to support public curfew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.