Join us

मेट्रो ३ : ८ हजार ८८८ कांदळवन रोपट्यांचे होणार रोपण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 18:35 IST

Metro 3 : धारावी  व बीकेसी स्थानकाच्या बांधकामासाठी एकूण १०८ कांदळवन बाधित

मुंबई : मुंबईमेट्रो रेल कॉर्पोरेशन (मुं.मे.रे.कॉ) व वन विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे आज कोपरखैराणे, नवी मुंबई येथून पर्यायी कांदळवन रोपण मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.  मेट्रो -३ प्रकल्पाच्या धारावी  व बीकेसी स्थानकाच्या बांधकामासाठी एकूण १०८ कांदळवन बाधित झाले होते त्या बदल्यात कॉर्पोरेशनद्वारे एकूण ८८८८कांदळवन रोपट्यांचे रोपण करण्यात येणार आहे.

पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी प्रत्येक टप्प्यात शक्य होतील ते सर्व प्रयत्न करण्यासाठीआम्ही कटिबद्ध आहोत. आणि पर्यायी कांदळवन रोपण हे त्यादृष्टीने उचलले पाऊल आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ सारखा महत्त्वपूर्ण सार्वजनिक वाहतूक प्रकल्प राबवित असताना आमच्या हरित धोरणाचे कठोर पालन केले जाईल, असे मुं.मे.रे.कॉचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल म्हणाले.

वन विभागच्या कांदळवन कक्षाद्वारे कोपोरखैराणे येथिल २ हेक्टर भागात ८८८८ कांदळवनाचे रोपण करण्यात येईल.  रायझोफोरा मुक्रोनाटा ( Rizophora Mucronata)  व सेरिओपस टॅगल (Ceriops Tagal) या दोन प्रजातींचे रोपण येथे केले जाणार आहे, असे कार्यकारी संचालक (नियोजन) आर रमणा म्हणाले.

यावेळी डी आर पाटील, विभागीय वन अधिकारी, वन विभाग, महाराष्ट्र राज्य यांचे सह मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थिती होते.

टॅग्स :मेट्रोमुंबईपर्यावरण