पारा उतरणार; थंडी वाजणार, किमान तापमानात होणार घट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 08:14 AM2021-02-06T08:14:46+5:302021-02-06T08:15:27+5:30

Winter News : गायब झालेली थंडी पुन्हा एकदा परत येत आहे. कारण हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात किमान तापमानात घट होणार आहे.

Mercury will come down; It will be cold, the minimum temperature will drop | पारा उतरणार; थंडी वाजणार, किमान तापमानात होणार घट

पारा उतरणार; थंडी वाजणार, किमान तापमानात होणार घट

Next

मुंबई : गायब झालेली थंडी पुन्हा एकदा परत येत आहे. कारण हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात किमान तापमानात घट होणार आहे, तर मुंबईचे किमान तापमान १६ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येईल, अशी शक्यता आहे. परिणामी, वाढत्या किमान तापमानाने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना किंचित दिलासा मिळेल.

जानेवारीत मुंबईत बऱ्यापैकी थंडी पडली होती. डिसेंबर महिन्याच्या शेवटी मुंबईत पडलेल्या थंडीने मुंबईकरांना सुखद गारवा दिला होता, तर मधल्या काळात पडलेला अवकाळी पाऊस, उठलेले प्रदूषण अशा बदलामुळे मुंबईची हवा बिघडली होती. डिसेंबर महिना संपताना आणि नवे वर्ष सुरू होताना येथील प्रदूषण कमालीचे वाढले होते. त्यात हवामान बदलाने भर घातली होती. आता थंडी पुन्हा पडणार असतानाच प्रदूषणही वाढत आहे. 

प्रदूषणही वाढण्याची शक्यता
आता हवामान खात्याने किमान तापमानात घट होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे पुन्हा थंडीसोबतच प्रदूषणही वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मुंबई आणि राज्यभरातील किमान व कमाल तापमानाचा आलेख पाहता, राज्यभरात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३० अंशांवर दाखल झाला आहे, 

Web Title: Mercury will come down; It will be cold, the minimum temperature will drop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.