महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अस्त, शरद पवारांनी जागवल्या आठवणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 10:17 IST2021-05-16T10:14:57+5:302021-05-16T10:17:14+5:30
काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती.

महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अस्त, शरद पवारांनी जागवल्या आठवणी
मुंबई - काँग्रेसचे राज्यसभा खासदारराजीव सातव यांचे निधन झाले आहे. पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर, डॉक्टरांनी त्वरीत औषधोपचार सुरू केले. शनिवारी दिवसभरात सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, कोरोनानंतर आजाराशी त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनानंतर देशभरातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. खासदार शरद पवार यांनीही ट्विट करुन त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. तसेच, खासदार सुप्रिया सुळे यांनीही श्रद्धांजली वाहिली आहे.
काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!, असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलंय.
गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 16, 2021
भावपूर्ण श्रद्धांजली!
खासदार सुप्रिया सुळे यांनीही वाहिली श्रद्धांजली
काँग्रेसचे खासदार व आमचे संसदेतील सहकारी राजीवजी सातव यांचे निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद बातमी आहे.त्यांनी कोरोना विषाणूशी जोरदार झुंज दिली. पण ही झुंज अपयशी ठरली. ते एक उत्तम संसदपटू तर होतेच याशिवाय ते माणूसकी जपणारे नेते होते. pic.twitter.com/P7DaIRw3tw
— Supriya Sule (@supriya_sule) May 16, 2021
सातव यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोनावर मात देखील केली होती. पण, सातव यांना 'सायटोमेगँलोव्हायरस' या नव्या विषाणूची लागण झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारीच सांगितले होते. गेल्या १५ दिवसांपासून राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहाँगिर रुग्णालयात उपचार सुरू होते. औषधांना ते योग्य प्रतिसाद देत असल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. सत्यपालसिंग यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे चांगली सुधारणा होत होती. ते आता धोक्याबाहेर असल्याचे बोलले जात होते असे असताना शुक्रवारी रात्री अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर, रविवारी त्यांचे निधन झाले. काँग्रचे प्रवक्ता रणदीपसिंह सुरजेवाला यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे.
अलविदा मेरे दोस्त...
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही शोक व्यक्त करत राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. निशब्द... आज माझ्यासाठी, तमाम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी काळा दिवस. माझा मित्र, माझा भाऊ राजीव सातव आज आमच्यात नाही. भावपूर्ण श्रद्धांजली,
काय बोलाव काय लिहाव काही कळत नाही, ही हानी कधीही न भरून निघणारी आहे. अलविदा मेरे दोस्त !, असे ट्विट करत नाना पटोले यांनी दु:ख व्यक्त केलंय.
निशब्द..
— Nana Patole (@NANA_PATOLE) May 16, 2021
आज माझ्यासाठी, तमाम कॉंग्रेसच्या कार्यकर्ता साठी काळाचा दिवस.
माझा मित्र, माझा भाऊ राजीव सातव आज आमच्यात नाही.
.
भावपूर्ण श्रद्धांजली
काय बोलाव काय लिहाव काही कळत नाही, ही हाणी कधीही न भरून निघणारी आहे.
अलविदा मेरे दोस्त ! pic.twitter.com/mYU8b0ASJn