Mega Block Today : मध्य, हार्बर रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 10:05 AM2021-06-06T10:05:09+5:302021-06-06T10:06:38+5:30

Mega Block Today : ब्लॉक कालावधीत ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते वाशी व नेरूळ स्थानकांदरम्यान रेल्वे सेवा उपलब्ध असतील.

Megablocks today on the Central, Harbor railway lines | Mega Block Today : मध्य, हार्बर रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक

Mega Block Today : मध्य, हार्बर रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक

Next
ठळक मुद्देहार्बर मार्गावर पनवेल ते वाशीदरम्यान सकाळी ११ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत लोकलच्या फेऱ्या बंद राहतील.

मुंबई : रविवार (दि. ६ जून) रेल्वेच्या मध्य व हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते भायखळादरम्यान धीम्या व जलद मार्गावर रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत एकही लाेकल धावणार नाहीत, तर, हार्बर मार्गावर पनवेल ते वाशीदरम्यान सकाळी ११ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत लोकलच्या फेऱ्या बंद राहतील. अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांच्या साेयीसाठी ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान विशेष गाड्या चालविल्या जातील. ब्लॉक कालावधीत ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते वाशी व नेरूळ स्थानकांदरम्यान रेल्वे सेवा उपलब्ध असतील.
 

Web Title: Megablocks today on the Central, Harbor railway lines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.