Join us

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक! जाणून घ्या केव्हा आणि कुठे असणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 07:48 IST

रविवारी, २७ नोव्हेंबरला रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

मुंबई : दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी, २७ नोव्हेंबरला रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे  : कुठे? - माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर.   कधी? : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत. परिणाम : या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाउन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबतील. ठाण्याच्या पलीकडे या जलद गाड्या पुन्हा डाउन जलद मार्गावर वळवल्या जाणार आहे. तर ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबवल्या जातील. त्यापुढे या अप जलद सेवा अप जलद मार्गावर वळविल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. 

हार्बर रेल्वे :  कुठे? - चुनाभट्टी ते वांद्रे अप आणि डाउन हार्बर मार्गावर. कधी? - सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत. परिणाम - ब्लॉक कालावधीत सीएसएमटी आणि वडाळा रोड येथून वाशी/बेलापूर/पनवेलसाठी आणि सीएसएमटीहून वांद्रे/गोरेगावसाठी सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद असेल. पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. 

पश्चिम रेल्वे :  कुठे? - चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर.कधी? - सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यत.परिणाम: या ब्लॉकदरम्यान धीम्या मार्गावरील सर्व उपनगरी लोकल सेवा चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. तसेच या ब्लॉक कालावधीत अप आणि डाउन दिशेच्या काही उपनगरी लोकल रद्द असतील.

टॅग्स :लोकलमुंबईमहाराष्ट्ररेल्वे