मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:07 AM2021-07-31T04:07:33+5:302021-07-31T04:07:33+5:30

मुंबई : विविध देखभाल दुरुस्ती कामांसाठी मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र पश्चिम रेल्वेमार्गावर अंधेरी ...

Megablock on Central and Harbor Railway | मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक

मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक

Next

मुंबई : विविध देखभाल दुरुस्ती कामांसाठी मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र पश्चिम रेल्वेमार्गावर अंधेरी ते वांद्रे दरम्यान रविवारी मध्यरात्री १.१५ ते ४.१५ या वेळेत मेगाब्लॉक असल्याने दिवसकालीन मेगाब्लॉक नसणार आहे.

मध्य रेल्वेमार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत ठाणे-कल्याण दरम्यान अप व डाउन जलदमार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.३७ ते दुपारी २.४८ या वेळेत सुटणारी डाउन जलद/अर्धजलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवली जाईल व त्यांच्या नियोजित वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचेल. अप जलद/अर्धजलद मार्गावर कल्याण येथून सकाळी १०.२६ ते दुपारी ३.१९ दरम्यान सुटणारी सेवा कल्याण व ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील व नियोजित वेळापत्रकांपेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्य स्थानकावर पोहोचेल.

अप हार्बर मार्गावर पनवेल येथून सकाळी १०.४९ ते सायंकाळी ४.०१ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ या वेळेत पनवेल/बेलापूरसाठी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. अप ट्रान्सहार्बर मार्गावर पनवेल येथून सकाळी ९.०१ ते दुपारी ३.५३ या वेळेत ठाण्याच्या दिशेने सुटणाऱ्या सेवा आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० या वेळेत पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या सेवा बंद राहतील. डाउन बीएसयू मार्गावर नेरूळ येथून सकाळी १०.१५ ते दुपारी २.४५ या वेळेत खारकोपरला जाणारी सेवा आणि अप बीएसयू मार्गावर खारकोपर येथून सकाळी १०.४५ ते दुपारी ३.१५ या वेळेत नेरुळला जाणाऱ्या सेवा रद्द राहतील.

Web Title: Megablock on Central and Harbor Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.