तरुणीसह तिघा तस्करांकडून एमडी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:07 AM2021-07-30T04:07:33+5:302021-07-30T04:07:33+5:30

* एनसीबीची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अमलीपदार्थ नियंत्रण कक्षाच्या (एनसीबी) मुंबई विभागाच्या पथकाने एका महिलेसह तिघा तस्करांना ...

MD seized from three smugglers including a young woman | तरुणीसह तिघा तस्करांकडून एमडी जप्त

तरुणीसह तिघा तस्करांकडून एमडी जप्त

Next

* एनसीबीची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अमलीपदार्थ नियंत्रण कक्षाच्या (एनसीबी) मुंबई विभागाच्या पथकाने एका महिलेसह तिघा तस्करांना अटक करून १८ लाखांच्या रोकडसह एमडी जप्त केले. जाई प्रकाश भट्ट, रोहन पांडे व अब्रार खान अशी त्यांची नावे असून, पश्चिम उपनगरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून ही कारवाई करण्यात आली.

एनसीबीच्या पथकाने खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी अंधेरीतील हॉटेल थ्री स्टार येथे छापा मारून १०३.४ ग्रॅम एमडी जप्त केले. या वेळी जाई भट्टला पकडले. तिच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर दुसऱ्या दिवशी तिचा साथीदार रोहन याला मरोळ नाक्याजवळून अटक केली. तर बुधवारी रात्री मेघवाडीतील अमिना नगरातील चाळीत छापा मारून अब्रार खान याच्याकडून ८० ग्रॅम एमडी जप्त केले. घराच्या झडतीमध्ये १८ लाखांची रोकड मिळाली. तर जोगेश्वरी (पूर्व) येथे एकाला एमडी पार्सलची डिलिव्हरी करण्यासाठी जाणाऱ्या अब्रारला पकडण्यात आले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: MD seized from three smugglers including a young woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app