एमबीबीएस, बीडीएस प्रवेशासाठी आता ४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, पहिली गुणवत्ता यादी ११ ऑगस्टला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 09:38 IST2025-08-02T09:38:56+5:302025-08-02T09:38:56+5:30

सीईटी सेलने एलएलबीच्या तीन वर्षे अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

mbbs bds admission deadline extended till august 4 first merit list on august 11 | एमबीबीएस, बीडीएस प्रवेशासाठी आता ४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, पहिली गुणवत्ता यादी ११ ऑगस्टला

एमबीबीएस, बीडीएस प्रवेशासाठी आता ४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, पहिली गुणवत्ता यादी ११ ऑगस्टला

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस, बीएनवायएस, बीपीटीएच, बीओटीएच या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे. आता विद्यार्थ्यांना यासाठी ४ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येईल. त्यानंतर ११ ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे.

सीईटी सेलने यासाठी २३ जुलैपासून नोंदणी सुरू केली होती. विद्यार्थ्यांना   आता ४ ऑगस्टपर्यंत अर्ज आणि ५ ऑगस्टपर्यंत नोंदणी शुल्क भरणा करता येणार आहे.

एलएलबीचेही वेळापत्रक घोषित

सीईटी सेलने एलएलबीच्या तीन वर्षे अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यात २ ऑगस्टला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या फेरीसाठी ३ ते ५ ऑगस्टदरम्यान अर्ज करता येतील, तर विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत कॉलेजांचे वाटप ८ ऑगस्टला केले जाईल. या विद्यार्थ्यांना ११ ते १३ ऑगस्टदरम्यान कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेता येईल.

एमबीबीएस, बीडीएसचे वेळापत्रक

नोंदणीची मुदत    ४ ऑगस्ट
शुल्क भरण्याची मुदत    ५ ऑगस्ट
तात्पुरती गुणवत्ता यादी    ६ ऑगस्ट
कॉलेजांचे पर्याय निवड    ६ ते ९ ऑगस्ट
पहिली गुणवत्ता यादी    ११ ऑगस्ट
कॉलेजांमध्ये प्रवेश    १२ ते १७ ऑगस्ट

 

Web Title: mbbs bds admission deadline extended till august 4 first merit list on august 11

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.