वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 06:12 IST2025-11-26T06:11:28+5:302025-11-26T06:12:32+5:30
कुर्ला येथील एल वॉर्डात ७८ हजार दुबार नावे, डोंगरी, भेंडी बाजार, मस्जिद बंदरच्या बी वॉर्डात ८,३९८ तर प्रशासकीय विभागातील प्रभाग १९९ मध्ये सर्वाधिक व प्रभाग क्रमांक २२७ मध्ये सर्वांत कमी दुबार मतदार आहेत.

वरळीतील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार; उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागात आढळली दुबार नावे
मुंबई : उद्धवसेनेचे आ. आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघ जी दक्षिमधील ४ प्रभागांत सर्वाधिक दुबार मतदार आहेत. प्रभाग क्रमांक १९९ मध्ये ८,२०७, १९४ मध्ये ७,५८४, १९८ मध्ये ७,२९५ तर प्रभाग क्रमांक १९६ मध्ये ७,०९१ दुबार मतदार आहेत.
२६ वॉर्डांपैकी कुर्ला एलमध्ये सर्वाधिक दुबार मतदार असून, संख्या ७८,८२५ आहे. डोंगरी, भेंडी बाजार, मस्जिद बंदरच्या बी वॉर्डात ८,३९८ तर प्रशासकीय विभागातील प्रभाग १९९ मध्ये सर्वाधिक व प्रभाग क्रमांक २२७ मध्ये सर्वांत कमी दुबार मतदार आहेत.
प्रभाग दुबार मतदार माजी नगरसेवक
१९९ ८,२०७ किशोरी पेडणेकर (उद्धवसेना)
२०५ ७,५८५ दत्ताराम पोंगडे (उद्धवसेना)
१९४ ७,५८४ समाधान सरवणकर (शिंदेसेना)
२०३ ७,६२४ सिंधू मसूरकर (उद्धवसेना)
२०२ ७,४७० श्रद्धा जाधव (उद्धवसेना)
२२७ २,०९८ मकरंद नार्वेकर (भाजप)
१ २,१४२ तेजस्वी घोसाळकर (उद्धवसेना)
१८७ २,४२६ मरिअम्माल ठेवर (उद्धवसेना)
१३४ २,५८६ शायर खान (सपा)
१८३ २,६११ गंगा माने (शिंदेसेना)
सर्वाधिक कमी दुबार मतदार
बी (भेंडी बाजार,
मस्जिद बंदर) - ८,३९८
ए (कफ परेड,
कुलाबा) - १३,२०४
सी (काळबादेवी,
चिरा बाजार) - १४,२२४
टी (मुलुंड, नाहूर) - २९,३२८
एच पश्चिम (सांताक्रूझ पश्चिम, खार) - २७,२०९