Maharashtra Lok Sabha Election धारावीत मुंबई पब्लिक स्कूलमध्ये सर्वाधिक ३४ केंद्रे, मतदारांचा गोंधळ टाळण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 10:00 IST2024-05-20T09:59:15+5:302024-05-20T10:00:14+5:30
एकाच ठिकाणी अनेक मतदान केंद्रे असल्याने त्यांची शोधाशोध करताना नागरिकांचा गोंधळ उडू नये, यासाठी प्रशिक्षित कर्मचारीवर्ग नियुक्त केला जाणार आहे.

Maharashtra Lok Sabha Election धारावीत मुंबई पब्लिक स्कूलमध्ये सर्वाधिक ३४ केंद्रे, मतदारांचा गोंधळ टाळण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज
मुंबई : एकाच ठिकाणी सर्वाधिक मतदान केंद्रे असलेल्या ठिकाणांमध्ये धारावीतील ट्रान्झिट कॅम्प भागातील मुंबई पब्लिक स्कूल शाळेचा समावेश असून, या शाळेत तब्बल ३४ मतदान केंद्रे आहेत. त्याखालोखाल माहीममधील सेंट झेविअर्स टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये तब्बल २६ मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर मतदारांचा गोंधळ उडू नये, यासाठी प्रशासन सज्ज आहे.
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात एकूण १,५३९ मतदान केंद्रे आहेत. ही मतदान केंद्रे २९४ ठिकाणी आहेत. यातील एकाच शाळेत किंवा ठिकाणी ६ किंवा ६ पेक्षा अधिक मतदान केंद्रे ११० ठिकाणी आहेत. एकाच जागी अनेक मतदान केंद्र असल्याने या ठिकाणी मतदानासाठी मोठ्या संख्येने नागरिक दाखल होणार आहेत.
निरीक्षकांचा ‘वॉच’-
मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातील १४४ मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. हे निरीक्षक थेट सामान्य निरीक्षकांना रिपोर्ट करतात. तसेच मतदान केंद्रांवरील सर्व प्रक्रियांची पडताळणी करून त्याचा अहवाल थेट सामान्य निरीक्षकांना पाठवितात.
१) एकाच ठिकाणी अनेक मतदान केंद्रे असल्याने त्यांची शोधाशोध करताना नागरिकांचा गोंधळ उडू नये, यासाठी प्रशिक्षित कर्मचारीवर्ग नियुक्त केला जाणार आहे.
२) मतदारांना केंद्रांपर्यंत पोहोचता यावे, यासाठी केंद्रांना विशिष्ठ रंगाने रंगवले आहे. त्यातून मतदारांना त्यांचे मतदान केंद्र सहज मिळण्यास मदत होईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांनी सांगितले.
विधानसभा मतदारसंघनिहाय सर्वाधिक मतदान केंद्र-
१)धारावी विधानसभा - धारावी ट्रान्झिट कॅम्प येथील मुंबई पब्लिक स्कूल संकुल - ३४
२) माहीम - माहीम येथील सेंट झेवियर्स टेक्निकल इन्स्टिट्यूट - २६
३) चेंबूर विधानसभा - चेंबूर आनंदनगर सोसायटी येथील मुंबई पब्लिक स्कूल - २४
४) सायन कोळीवाडा - कर्मवीर भाऊराव पाटील स्कूल प्रतीक्षानगर - १८
५) अणुशक्तीनगर विधानसभा- ट्रॉम्बे चित्ता कॅम्प येथील शिवाजीनगर म्युन्सिपल स्कूल - १३
६) वडाळा - रफी मोहम्मद किडवई रोड ज्ञानेश्वर विद्यालय - ११
मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातील मतदान केंद्रांची संख्या-
१) ४९ ठिकाणी एकाच ठिकाणी २ मतदान केंद्रे
२) ४३ ठिकाणी ३ मतदान केंद्रे
३) २४ ठिकाणी ४ मतदान केंद्रे
४) २६ ठिकाणी ५ मतदान केंद्रे
५) ११० ठिकाणी ६पेक्षा अधिक मतदान केंद्रे