Join us
Daily Top 2Weekly Top 5

मविआला चार जागा परत करतो : प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 09:38 IST

ही मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला आहे. त्यांच्याकडून पुन्हा प्रस्ताव आला तर पुन्हा चर्चा करू, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मुंबई : महाविकास आघाडीसोबत जुळत नसतानाच आता स्वत:च वंचित बहूजन आघाडीच्या वतीने लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा केली आहे. २८ मार्च रोजी अकोला येथून ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी रविवारी जाहीर केले. मी मविआला त्यांच्या चार जागा परत करतोय. त्याच्यावर त्यांनी लढावे. आम्हाला चार जागा दिल्याचा प्रस्ताव त्यांनी दिला. मात्र प्रत्यक्षात आम्हाला अकोला आणि उर्वरित दोन जागा ऑफर केल्या. त्यामुळे त्यांनी खोटे बोलणे थांबवावे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

ते म्हणाले, आमच्या मागणीला फार काही प्रतिसाद मिळाला नाही. आम्हाला कुठेतरी सामावून घ्यायचे म्हणून त्यांचा प्रयत्न आहे. त्यांचा निर्णय अद्याप झालेला नाही. मविआमध्येच मतभेद आहेत. १५ जागांचा तिढा अद्याप कायम आहे. काँग्रेसने उमेदवार यादी जाहीर केली. पण मतभेद असलेल्या मतदारसंघातील उमेदवार जाहीर केलेले नाहीत. काही मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला आहे. त्यांच्याकडून पुन्हा प्रस्ताव आला तर पुन्हा चर्चा करू, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांनी एकतर्फी युती तोडल्याची घोषणा केली हे दुर्दैव आहे. लोकसभेसाठी आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिला, हा चार जागांचा प्रस्ताव कायम आहे. जागा वाटपात एखाद्-दोन गोष्टी मागेपुढे होऊ शकतात.     - संजय राऊत, खासदार

टॅग्स :प्रकाश आंबेडकरलोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४