BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 19:13 IST2024-10-09T19:11:55+5:302024-10-09T19:13:52+5:30
Mumbai Ghatkopar Fire: मुंबईच्या घाटकोपरमध्ये नारायण नगर परिसरात एका प्लास्टिकच्या रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती

BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
मुंबई-
मुंबईच्या घाटकोपरमध्ये नारायण नगर परिसरात एका प्लास्टिकच्या रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नारायण नगरच्या सम्राट शाळेजवळच ही कंपनी असून दाट लोकवस्तीचा परिसर आहे. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे आणि नागरिकांचीही धावपळ उडाली आहे.
चिंचोळ्या गल्ल्यांमुळे अग्निशमन दलालाही आग विझवण्यासाठी अडचणी येत आहेत. घटनास्थळावर सध्या अग्निशमन दलाच्या १० गाड्या पोहोचल्या आहेत. तसंच स्थानिक पोलीस, पालिका अधिकारी आणि रुग्णवाहिकाही पोहोचली आहे. आगीत अद्याप जखमींची माहिती समोर आलेली नाही. तसंच आगीचं कारणही अद्याप अस्पष्ट आहे.