VIDEO: अंधेरीत मरोळ येथे मुकुंद हॉस्पिटल परिसरात भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 15:26 IST2023-10-02T15:26:17+5:302023-10-02T15:26:59+5:30
अंधेरीच्या मरोळ येथील मुकुंद हॉस्पिटल परिसरात भीषण आग लागली. दुपारी १ वाजताच्या सुमारास ही लाग लागल्याची माहिती समोर आली आहे.

VIDEO: अंधेरीत मरोळ येथे मुकुंद हॉस्पिटल परिसरात भीषण आग
अंधेरीच्या मरोळ येथील मुकुंद हॉस्पिटल परिसरात भीषण आग लागली. दुपारी १ वाजताच्या सुमारास ही लाग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न केले. तासाभराच्या अथक प्रयत्नांनतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. तसंच या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण आगीमुळे बरंच नुकसान झालं आहे.
Video: मरोळ येथील मुकुंद नगर हॉस्पीटल येथे आग, अग्निशमन दल घटनास्थळी pic.twitter.com/daZpcXB1ub
— Lokmat Mumbai (@LokmatMumbai) October 2, 2023
अंधेरीच्या मरोळ पाइप लाइन बेस्ट बस स्टॉपजवळ ही घटना घडली. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून अग्निशमन दलाकडून सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू आहे.