Join us

लोअर परळमधील टाईम्स टॉवरला भीषण आग; परिसरात धुराचे लोट, पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 07:43 IST

आगीची माहिती मिळताच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या दाखल झाल्या आहेत. 

मुंबई : मुंबईतील लोअर परळ परिसरात असणाफ्या कमला मिल कंपाऊंडमधील टाईम्स टॉवरला आग लागल्याचे वृत्त आहे. टाईम्स टॉवरला आज शुक्रवारी (दि.६) पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली.

आगीमुळे परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट पसरले असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. आगीची माहिती मिळताच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलासोबत इतर सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच, अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे काम सुरु आहे.

या भीषण आगीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. सध्यातरी या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे. दरम्यान, कमला मिल कंपाऊंडमधील टाईम्स टॉवर ही ग्राउंड प्लस सातमाळ्याची बिल्डिंग आहे.

 

टॅग्स :मुंबईआगअग्निशमन दल