‘सॉरी, नहीं हो रहा हैं...’ व्हिडीओ पाठवून विवाहितेनं संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 07:43 IST2025-11-11T07:43:28+5:302025-11-11T07:43:33+5:30
Mumbai News: ‘सॉरी, नहीं हो रहा हैं,’ असे म्हणत विवाहितेने गळफास घेत आयुष्य संपविल्याची धक्कादायक घटना जे. जे. मार्ग परिसरात घडली. हुंड्यासाठी पतीकडून सुरू असलेल्या अमानुष छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. तिने आत्महत्येपूर्वी अत्याचाराची माहिती देणारा व्हिडीओ तयार करून तो पालकांना पाठवला होता.

‘सॉरी, नहीं हो रहा हैं...’ व्हिडीओ पाठवून विवाहितेनं संपवलं जीवन
मुंबई - ‘सॉरी, नहीं हो रहा हैं,’ असे म्हणत विवाहितेने गळफास घेत आयुष्य संपविल्याची धक्कादायक घटना जे. जे. मार्ग परिसरात घडली. हुंड्यासाठी पतीकडून सुरू असलेल्या अमानुष छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. तिने आत्महत्येपूर्वी अत्याचाराची माहिती देणारा व्हिडीओ तयार करून तो पालकांना पाठवला होता. याप्रकरणी जे. जे. मार्ग पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या व्हिडीओसह याआधी तिच्याकडून आलेले शारीरिक, मानसिक छळाचे व्हॉट्सॲप व्हॉइस रेकॉर्डिंग पालकांनी पुरावा म्हणून पोलिसांकडे सादर केले.
मेहक (२६) असे मृत विवाहितेचे नाव असून, २०१९ मध्ये इम्रानशी तिचा विवाह झाला होता. तिची आई शरफुद्दीन चांद उस्मानी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तक्रारीनुसार, लग्नाच्या अवघ्या दोन आठवड्यांतच तिचा छळ सुरू झाला. याच त्रासाबाबत तिने अनेकदा पालकांसह इम्रानच्या नातेवाइकांना माहिती देत माहेरी धाव घेतली. मात्र, अनेकदा फक्त समजावून तिला पुन्हा सासरी पाठवण्यात आले. ७ नोव्हेंबरला मेहेक नोकरीवरून सुटल्यानंतर तळोजा येथे माहेरी गेली. ८ नोव्हेंबरला ती आपल्या घरी परतली. रात्री १० च्या सुमारास आईसोबत बोलणे झाले. मात्र, अर्ध्या तासानंतर तीने गळफास घेतला.
मानसिक त्रास संपणार नाही
‘पतीचा मानसिक त्रास कधीच संपणार नाही’८ नोव्हेंबरच्या रात्री १०:२५ ते १०:३० दरम्यान मेहकने सुसाइड करत असल्याचा व्हिडीओ पाहून आईला धक्का बसला.
व्हिडीओत, ‘सॉरी, नहीं हो रहा है, बट’. त्यावेळी तिच्या गळ्यात ओढणीचा गळफास दिसला. मेहकला फोन करताच, मी आता थकली आहे. प्रत्येकवेळी समजावून पतीकडे पाठवतात.
पतीचा मानसिक त्रास कधीच संपणार नाही. आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे तिने सांगत फोन कट करत आत्महत्या केली.