नवरात्रीसाठी बाजारपेठा सजल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 01:36 AM2019-09-28T01:36:12+5:302019-09-28T01:36:42+5:30

नवरात्रीसाठी शहर, उपनगरातील बाजारपेठादेखील सज्ज झालेल्या आहेत.

The markets for Navratri are decorated | नवरात्रीसाठी बाजारपेठा सजल्या

नवरात्रीसाठी बाजारपेठा सजल्या

Next

मुंबई : मुंबईकरांना चाहूल लागलेल्या देवीचे आगमन लवकरच होणार आहे. नवरात्रीसाठी शहर, उपनगरातील बाजारपेठादेखील सज्ज झालेल्या आहेत. देवीच्या आगमनासाठी काही तास शिल्लक राहिल्याने मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्यात मूर्तिकार रमले आहेत. सोबतच या उत्सवाचे आकर्षण असलेल्या दांडिया आणि रास गरब्याच्या वस्तूंच्या खरेदीसाठी भाविकांची बाजारात झुंबड उडाली आहे; मात्र आर्थिक मंदीमुळे ग्राहकांचा तितकासा प्रतिसाद नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

उत्सवामध्ये मुलींचा विशेष पेहराव असलेली घागरा-चोळी मुंबईच्या बाजारात पाहावयास मिळत आहेत. सलग नऊ रात्री गरबा खेळण्यासाठी वेशभूषेचा महत्त्वाचा भाग असलेला राजस्थानी घागरा, धोती, कुर्ता यांकडे तरुणाईचा कल वाढत आहे. खास राजस्थानी कुर्त्यांची अधिक मागणी आहे. पारंपरिक पद्धतीचे गुजराती आणि मारवाडी कपडे भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यंदाही पारंपरिक, रबारी, कच्छी भरत या घागरा-चोळींना अधिक मागणी असल्याचे चित्र दिसत आहे.

घागरा-चोळी आणि दांडियासोबतच वेगवेगळ्या आॅक्साईडच्या दागिन्यांनादेखील विशेष मागणी असल्याचे दिसून येत आहे. कवड्या, मणी शिवाय कडे, कंबरपट्टा, झुमका, बाहूंना लावायचे तोडे, पायातील वाळे यांसारख्या आकर्षक दागिन्यांनी बाजार फुलला आहे. मेटल आणि काळ्या धाग्यापासून बनवलेले २० रुपयांपासून पुढचे आकर्षक नेकलेस उपलब्ध आहेत. डायमंड, मेटलपासून बनविण्यात आलेला कंबरपट्ट्याची किंमत १०० रुपयांपासून पुढे आहे. या उत्सवामध्ये दागिन्यांच्या कलाकुसरीलाही महत्त्व प्राप्त झाले आहे. महिलांसोबत पुरुषसुद्धा दांडिया खेळण्यात रमलेले दिसून येतात. त्यासाठी पुरुषांचेही गरबा स्पेशल कपडे बाजारात उपलब्ध आहेत. विशेषत: मुलांच्या कुर्त्यांना अधिक मागणी आहे. आकर्षक भरतकाम आणि विविध रंग यामुळे हे पेहराव अधिक खुलून दिसतात.

लहान मुलांसाठी आकर्षक रंगसंगतीमधील छोटेछोटे कपडे लक्ष वेधून घेत आहेत. लोकरीचे वर्क केलेले आणि सोबतच पॅचवर्कमधील आकर्षक जॅकेट्सही बाजारात उपलब्ध आहेत. काही ठिकाणी ग्राहकांच्या मागणीनुसार कपडे शिवूनही घेतले जातात. देवीला आवश्यक असणाऱ्या साहित्यानेदेखील मुंबईची बाजारपेठ फुलली आहे.

टिपऱ्यांमध्येही वैविध्य
लाकडी, मेटल, लाइटवाली तसेच अ‍ॅक्रेलिकपासून तयार केलेल्या दांडिया, बांधणी टिपरी, चुनरी दांडिया, डिस्को टिपरी इत्यादी दांडियांचा समावेश आहे. याशिवाय विविध रंगाच्या लेस, आकर्षक मणी, डायमंड, गोंडे या वस्तूंनी सजवलेल्या लाकडी दांडियादेखील आकर्षक ठरत आहेत.
ग्राहकांची अधिक पसंती डिस्को आणि बांधणीच्या टिपºयांना आहे.
कचाकड्याच्या टिपºयादेखील बाजारात उपलब्ध आहेत. त्यांची किंमत १०० ते २०० रुपयांपर्यंत आहे. सोनेरी, चंदेरी लेसेस गुंडाळलेल्या टिपºयादेखील अनेक तरुणींच्या पसंतीस उतरल्या आहेत. त्यांची किंमत साधारणत: १०० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत आहे. मल्टी कलरच्या टिपºया ७० रुपयांपासून ते १५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

Web Title: The markets for Navratri are decorated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.