मराठी अभ्यास केंद्र बहाल करणार दिनू रणदिवे पत्रकारिता पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 05:32 PM2020-07-08T17:32:43+5:302020-07-08T17:33:07+5:30

अभ्यासू आणि निःस्पृह पत्रकार म्हणून दिनू रणदिवे यांनी केलेले कार्य थोर आहेच पण मराठी भाषेच्या संवर्धनासाठी त्यांनी दिलेले योगदानही महत्त्वाचे आहे.

Marathi Study Center to present Dinu Ranadive Journalism Award | मराठी अभ्यास केंद्र बहाल करणार दिनू रणदिवे पत्रकारिता पुरस्कार

मराठी अभ्यास केंद्र बहाल करणार दिनू रणदिवे पत्रकारिता पुरस्कार

googlenewsNext


मुंबई : अभ्यासू आणि निःस्पृह पत्रकार म्हणून दिनू रणदिवे यांनी केलेले कार्य थोर आहेच पण मराठी भाषेच्या संवर्धनासाठी त्यांनी दिलेले योगदानही महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या या योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त करावी आणि मराठी भाषा, संस्कृती यांच्या संवर्धनासाठी नवोदित पत्रकारांना प्रेरणा मिळावी यांसाठी मराठी अभ्यास केंद्राने पुढील वर्षापासून दिनू रणदिवे मराठीस्नेही पत्रकारिता पुरस्कार देण्याचे ठरवले आहे.

मराठी अभ्यास क्रँद्रातर्फे देण्यात येणार हा पुरस्कार दर वर्षी मराठी भाषा दिनाला केंद्राच्या अन्य भाषा पुरस्कारांसोबत समारंभपूर्वक दिला जाईल. ह्या पुरस्कारासाठी मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, ऑनलाईन माध्यमे अशा सर्व क्षेत्रांचा विचार केला जाईल. तसेच  ह्या पुरस्कारासाठी मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, ऑनलाईन माध्यमे अशा सर्व क्षेत्रांचा विचार केला जाईल अशी माहितीमराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष प्रकाश परब यांनी दिली.  

सामाजिक भान, निःस्पृह पत्रकारिता, आणि मराठी भाषा-संस्कृतीविषयी जाज्ज्वल्य अभिमान यांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे अलीकडेच वृद्धापकाळाने निधन झाले. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो की, स्वराज्यात मराठी भाषेवरील अन्यायाविरोधात दाद मागणारे आंदोलन असो दिनू रणदिवे नेहमीच पत्रकार आणि मराठीप्रेमी नागरिक म्हणून मराठीच्या बाजूने सक्रिय राहिले होते. त्यांच्या कार्याचा गौरव आणि नवोदित पत्रकारांना प्रेरणा हा या पुरस्काराचा उद्देश असल्याचे परब यांनी सांगितले.

Web Title: Marathi Study Center to present Dinu Ranadive Journalism Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.