लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मराठी माणसांना अनेक क्षेत्रातील बंद दरवाजे शिवसेनेच्या आंदोलनामुळे उघडले. फक्त आंदोलन न करता प्रशिक्षण वर्ग सुरू केले. कुणालाही पैसे देण्यापेक्षा पैसे कमवायला शिकवणे हे फार महत्त्वाचे काम आहे. मेहनतीला कुठेही कमी नसणाऱ्या व न्यायाचे, हक्काचे मागणाऱ्या मराठी माणसाला स्वत:च्या पायावर उभे राहण्यास शिवसेनेने शिकवले, असे प्रतिपादन उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी शिवसेना भवन येथे लॉजिस्टिक्स प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाने तरुण-तरुणींसाठी लॉजिस्टिक्स क्षेत्रातील हा प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केला आहे. कस्टम्स क्लिअरन्स, लॉजिस्टिक्स ऑपरेशन्स, वेअरहाऊसिंग आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटबाबत प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी निर्माण करणे या उद्देशाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेट फॉरवर्डर्सच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
राज्यभर वर्ग सुरू करणार
महाराष्ट्र हे इतर काही देशांपेक्षा मोठे राज्य आहे. येथील क्षमतेचा वापर केल्यास महाराष्ट्रात मोठी इकाॅनॉमी होण्याची ताकद आहे. आता लॉजिस्टिकचे क्षेत्र समोर येत आहे. प्रत्येक गोष्टीला लॉजिस्टिक लागते. त्यामुळे असे प्रशिक्षण वर्ग राज्यभर सुरू करण्याची इच्छा आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.
पांघरूण खाते सुरू करा
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे अनेक काळे कारनामे समोर आले असून अनेक राजकीय व्यक्तींशी त्यांचे संबंध असल्याचे उघड झाले आहे. अशा भोंदू बाबांकडे जाणारा कोणत्याही पक्षाचा कुठलाही नेता जात असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. या सगळ्यांच्या पापावर पांघरूण घालणारे खाते सरकारने सुरू करावे, अशी टीका केली. तसेच महाराष्ट्राच्या या गंभीर एपस्टीन प्रकरणावरून कोणाचे लक्ष उडू नये यासाठी दुसरा विषय सुरू होऊ नये. जादूोणा विरोधी कायद्याचे कठोरतेने पालन होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षाही ठाकरे यांनी व्यक्त केली.
असा असेल अभ्यासक्रम…
प्रशिक्षण कालावधी सहा आठवडेलॉजिस्टिक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांकडून धडेअनुभवी व्यावसायिकांकडून मार्गदर्शनथिअरीसह प्रात्यक्षिकाची जोड
Web Summary : Uddhav Thackeray inaugurated logistics training for Marathi youth, emphasizing self-reliance. The program, under the local rights committee, aims to create jobs in logistics, with statewide expansion planned. Thackeray also criticized associations with fraudulent babas and demanded strict enforcement of anti-superstition laws.
Web Summary : उद्धव ठाकरे ने मराठी युवाओं के लिए लॉजिस्टिक्स प्रशिक्षण का उद्घाटन किया, आत्मनिर्भरता पर जोर दिया। स्थानीय अधिकार समिति के तहत कार्यक्रम का उद्देश्य लॉजिस्टिक्स में नौकरियां पैदा करना है, राज्यव्यापी विस्तार की योजना है। ठाकरे ने धोखाधड़ी वाले बाबाओं के साथ संबंधों की आलोचना की और अंधविश्वास विरोधी कानूनों के सख्त प्रवर्तन की मांग की।