Join us

मराठा समाज लवकरच करणार राजकीय पक्षाची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 06:33 IST

सप्टेंबरमध्ये घोषणा : धनगर, मुस्लीम समाजाचे प्रश्न सोडविण्यातही पुढाकार

मुंबई : मराठा समाजाच्या वतीने अनेक आंदोलने छेडण्यात आली. मात्र, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. तत्कालीन आणि आताच्या सरकारने समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे मराठा समाजाच्या सर्व संघटनांना सोबत घेऊन नव्या राजकीय पक्षाची स्थापना करणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील यांनी शनिवारी दिली.

ते म्हणाले, मराठा समाजातर्फे सप्टेंबरमध्ये राज्यातील ६ विभागांत दौरा करून, सहमतीने सप्टेंबरअखेर पक्षाची भूमिका, उद्देश, नाव प्रतापगडावर घोषित करण्यात येईल. दौऱ्यात कुठल्याच राजकीय पक्षाच्या नेत्याची भेट न घेता मराठा समाजाच्या समन्वयकांशी, लोकप्रतिनिधींची भेट घेतली जाईल. त्यानुसार, पुढील वाटचाल निश्चित करू. धनगर, मुस्लीम समाजाचे प्रश्न सोडवण्यातही पुढाकार घेण्यात येईल. आझाद मैदानात महिला कार्यकर्त्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलकांची दिशाभूल न करता, त्यांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही पाटील यांनी दिला. संघटनेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख परेश भोसले, युवा प्रमुख मोहन मालवणकर आदी उपस्थित होते.गुन्हे मागे घेण्याची मागणीच्मराठा समाजाला आरक्षण मिळावे, मराठा आरक्षणासाठी राज्यातील बंदमध्ये सामील झालेल्या मराठा बांधवांवर दाखल केलेले सर्व गुन्हे सरसकट मागे घ्यावेत, अशी मागणी मराठा महिलांनी शनिवारी आझाद मैदानात केली.च्गुरुवारपासून मराठा समाजातील महिला कार्यकर्त्यांचे आझाद मैदानात ठिय्या आंदोलन सुरू आहे. शनिवारी या मागणीवर ठिय्या आंदोलनातून जोर देण्यात आला. ‘तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय’, ‘मागे घ्या मागे घ्या, आमच्या मावळ्यांवरचे आरोप मागे घ्या’ अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी केल्या. राज्यातील बंदमध्ये सामील झालेल्या मराठा बांधवांवरील गुन्हे मागे घ्यावेत. फक्त यामध्ये वाळुंज व चाकण प्रकरण सोडून देण्यात यावे, असे म्हणणे आंदोलनकर्त्यांनी मांडले. राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क योजनेंतर्गत मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची ५० टक्के फी माफ करावी अशा अनेक मागण्याही या वेळी करण्यात आल्या.महिला उमेदवारांना प्राधान्यलोकसभेच्या १० आणि विधान सभेच्या २५ जागा लढविणार असून महिला उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल, असेही पाटील म्हणाले. 

टॅग्स :मराठामराठा आरक्षणमराठा क्रांती मोर्चा