maratha reservation maratha kranti morcha to agitate tomorrow at various places in mumbai | आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानं मराठा समाज आक्रमक; उद्या मुंबईत ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन

आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानं मराठा समाज आक्रमक; उद्या मुंबईत ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा क्रांती मोर्चाकडून उद्या मुंबईमध्ये जवळपास २० ते २५ ठिकाणी सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान ठिय्या आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आवश्यक त्या सर्व नियमांचं पालन करून मुंबईत ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात येणार आहेत.

मुंबई लगतच्या शहरांमध्येदेखील एकाचवेळी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा बांधवांनी आपापल्या विभागातील ठरलेल्या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला हजेरी लावण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा, महामुंबई यांच्यातर्फे करण्यात आले आहे. 

मुंबईतील ठिय्या आंदोलनाची ठिकाणे-
१. प्लाझा सिनेमा,दादर (प)
२. भारतमाता टॉकीज, लालबाग
३. शिवाजीराजे पुतळा, पांजरपोळ, चेंबूर
४. वरळी नाका, वरळी 
५. गिरगाव चर्च, गिरगाव
६. कला नगर जंक्शन, बांद्रा (पू)
७. शिवस्मारक, विमानतळ, पश्चिम दृतगती, मार्ग, विलेपार्ले(पू)
८.  जोगेश्वरी रेल्वे स्थानक (पू) 
९. शाम नगर तलाव, जोगेश्वरी (पू)
१०. दहिसर रेल्वे स्थानक (पू/प)
११. शिवाजी चौक, बरकत नाका, वडाळा (पू)
१२. संगमेश्वर मंदिर, कुर्ला (प)
१३. साईबाबा मंदिर, मानखुर्द (प)
१४. मराठी विद्यालय, पंतनगर, घाटकोपर (पू)
१५. गणेश मंदिर, भटवाडी, घाटकोपर (प)
१६. शिवाजी महाराज पुतळा, कन्नमवार नगर-२, विक्रोळी(पू)
१७. आयआयटी गेट समोर, पवई
१८. शिवाजी तलाव, भांडुप (प)

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: maratha reservation maratha kranti morcha to agitate tomorrow at various places in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.